Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात होणार पंधराशे कोटींची कामे”: छगन भुजबळ

October 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
chhagan bhujbal

मुक्तपीठ टीम

स्वच्छ भारत मिशन २ अंर्तगत येणाऱ्या दोन तीन वर्षात जिल्ह्यात सुमारे १५०० कोटी रुपयांची कामे होणार असून सुमारे २६१ कोटी रुपयांची लवकरच सुरू होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

 

भुजबळ फार्म येथे स्वच्छ भारत मिशन-२ अंतर्गत नाशिक जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात बाबत योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पी.सी.भांडेकर, शाखा अभियंता व्ही.व्ही. देसले, शाखा अभियंता येवला एम. एस.पाटील, शाखा अभियंता निफाड ए. बी.पाटील, सहायक अभियंता ए. के.घुगे उपस्थित होते.

 

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्वच्छ भारत मिशन २ अंतर्गत नाशिक जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच जलजीवन मिशन योजनेद्वारे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण ६२ टक्के नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून ग्रामीण भागात सर्वांना नळाद्वारे पाणी उपलब्ध होईल यासाठी जलजीवन मिशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील छोट्या योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

जिल्ह्यातील १९० योजनांपैकी १२५ योजना मार्गी लागल्या असून इतर कामे सुरू आहेत. वाड्या वस्त्यांकरिता ५७२ योजना राबविण्यात येणार आहे. त्यापैकी २०० योजनांचे अंदाजपत्रके तयार झालेले आहेत. इतर योजनांच्या सर्वेची कामे सुरू आहेत. मार्च २०२२ पर्यंत १०० टक्के कामांना वर्क ऑर्डर देण्यात येऊन कामे मार्गी लागतील.येवल्यात जिल्हा परिषद अंतर्गत १५ नवीन योजना प्रस्तावित आहे. त्यातील ११ योजनांचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिली आहे.


Tags: Minister Chhagan Bhujbalnashikछगन भुजबळनाशिक
Previous Post

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी कॉसिस ई-मोबिलिटीसोबत 2,823 कोटींचा सामंजस्य करार

Next Post

“कामांचे नियोजन करतांना भूमिपुत्रांचा विचार करावा”: जयंत पाटील

Next Post
jayant patil

"कामांचे नियोजन करतांना भूमिपुत्रांचा विचार करावा": जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!