Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Google for India 2022 : भारतीय यूजर्ससाठी नवं काय खास?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Google for India 2022

 मुक्तपीठ टीम

गुगलने १९ डिसेंबर २०२२ रोजी त्यांच्या ‘गुगल फॉर इंडिया २०२२’ कार्यक्रमात काही नवीन फिचर्सची घोषणा केली. कंपनी विशेषत: भारतासाठी काही नवीन सेवा सुरू करणार आहे आणि या कार्यक्रमात त्यावर चर्चा करण्यात आली. आधीच अस्तित्वात असलेल्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासोबतच काही नवीन टूल्सही जारी करण्यात येत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. कंपनीने आपल्या अॅपमध्ये नवीन अपडेट्स आणि बदल जारी केले आहेत.

कंपनीने त्यांच्या डिजिलॉकर आणि गुगल-पे मध्ये नवीन ट्रान्झॅक्शन सर्च फिचर जोडले आहे. गुगल फॉर इंडियाचे ८वे एडिशन १९ डिसेंबर रोजी प्रगती मैदान, दिल्ली येथे झाले. या कार्यक्रमात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. गुगल यूट्यूब निर्मात्यांच्या सहकार्याने यूट्यूब अभ्यासक्रमही सुरू करणार आहे.

गुगल-पे मध्ये नवीन ट्रान्झॅक्शन सर्च फिचर कसे असणार?

  • गुगलने त्यांच्या कार्यक्रमात डिजिटल पेमेंट अॅप गुगल-पे साठी नवीन ट्रान्झॅक्शन सर्च फिचर सुरू केला आहे.
  • या फिचरच्या मदतीने युजर्सना त्यांच्या व्यवहारांबद्दल जाणून घेण्यास मदत होणार आहे.
  • यासोबतच यूजर्स त्यांच्या आवाजाद्वारे ट्रान्झॅक्शन पाहू शकतील. कंपनीचे म्हणणे आहे की आता गुगल-पेवर पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षा उपलब्ध होणार आहे.

गुगलने ‘सर्च इन व्हिडीओ फीचर’ देखील आणले आहे जे स्मार्ट उपकरणांवर सर्च अॅपद्वारे व्हिडीओ शोधण्याचा पर्याय देईल. गुगल सर्चसाठी मल्टीसर्च फिचर आणण्याचा विचार करत आहे. हे यूजर्सना सहज फोटो किंवा स्क्रीनशॉट घेण्यास आणि सर्च करण्यासाठी त्यांच्या क्वेरीमध्ये मेसेज टाकण्यासाठी अनुमती देईल. गुगलने जाहीर केले की हे फिचर अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल.

डिजीलॉकर आणि फाइल्स लिंक होणार

  • गुगलने डिजिटल डॉक्युमेंट अॅप डिजीलॉकरमधील फिचर्स वाढवले असून, गुगल शेअरिंग अॅप फायलींसाठी इंटीग्रेट केले आहे.
  • यूजर्स फाईल्स अॅपद्वारे डिजिलॉकर अॅपच्या व्हेरिफाइड डिजिटल कागदपत्रांमध्ये देखील प्रवेश करू शकतात.

गुगल रिमोट सेन्सिंगच्या सहाय्याने शेतीशी संबंधित कामांमध्ये होणार मदत!

  • या कार्यक्रमात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधला.
  • पिचाई म्हणाले की, गुगल भारतातील शेतीला नवी दिशा देण्यासाठी रिमोट सेन्सिंग क्षमता वापरत आहे.
  • यासाठी कंपनीने एक मॉडेल तयार केले आहे. सध्या तेलंगणामध्ये त्याची चाचणी सुरू आहे.
  • या एआय-आधारित मॉडेलच्या मदतीने, पूर यांसारख्या आपत्तींचा अंदाज लावण्यात आणि शेतीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात मदत होईल.

Tags: good newsGoogle CEO Sundar PichaiGoogle for India 2022muktpeethNew Featuresगुगल फॉर इंडिया २०२२गुगल सीईओ सुंदर पिचाईघडलं-बिघडलंचांगली बातमीनवीन फिचर्समुक्तपीठ
Previous Post

नववर्ष आणि नाताळच्या सुट्टीत महाराष्ट्रात करा मनमुराद भटकंती! एमटीडीसीच्या विविध सवलती!!

Next Post

विद्यार्थी साहाय्यक समितीतील ६६१ विद्यार्थ्यांची रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडतर्फे आरोग्य तपासणी

Next Post
Tapasani

विद्यार्थी साहाय्यक समितीतील ६६१ विद्यार्थ्यांची रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडतर्फे आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!