मुक्तपीठ टीम
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आपल्या भाषणात केलेली मशिदींवरील भोंग्यांविरोधातील स्पीकरवरील हनुमान चालीसाचा देशभर गाजला. मनसेचे काही नेते कार्यकर्ते हनुमान चालीसा पठन करु लागले. मात्र, त्याचवेळी मनसेतील काही नेत्यांनी नाराजीचे भोंगे वाजवण्यास सुरुवात केली आहे. काही मुस्लिम मनसे पदाधिकाऱ्यांनी या भूमिकेमुळे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याची भूमिका घेतलेली असतानाच. पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे नगरसेवक नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांनी राज ठाकरेंवर नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी ते भोंगे आंदोलन करणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच
काय म्हणाले वसंत मोरे?
- राज ठाकरेंची भूमिका ही पक्षाची भूमिका आहे.
- मला त्याबद्द्ल बोलायचे नाही आहे.
- परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी अडचण होते आहे.
- कारण २०२२ च्या निवडणुकीचा जर विचार केला जो प्रभाग माझ्या प्रभागाला जोडला गेला आहे तिथे नक्कीच मला या गोष्टींची अडचण होऊ शकते.
- आता साईनाथ किती अडचण होतेय ते मला माहित नाही परंतु माझं जे पंधरा वर्षांचं निरिक्षण आहे, पंधरा वर्षांमध्ये ती लोकं (मुसलमान मतदार) मला मतदान करत आले आहेत.
- अनेक ठिकाणी कब्रस्तानचं काम असेल, मुस्लिमांना वेगवेगळ्या जर अडचणी असतील तर हक्काने मुस्लिम लोक माझ्याकडे मदतीसाठी येतात.
- पक्ष म्हणून माझी भूमिका ही साहेबांसह ठाम असेल परंतु, एक लोकप्रतिनिधी म्हणून जर मी विचार केला तर मला वाटतं की सर्व धर्माची लोकं माझ्याकडे येतात.
- माझा भाग हा मला कायम शांत राहिला पाहिजे.
- तिथे कुठेही वाद झाले नाही पाहिजे, अशीच माझी भूमिका राहिल.
सरकारला अल्टिमेटम द्यावा….
- राज ठाकरेंवरती आयुष्यात मी कधी नाराज होऊ शकत नाही.
- गेली २७ वर्ष मी राज ठाकरे यांच्या संपर्कात आहे.
- परंतु कार्यकर्ता आणि लोकप्रतिनीधी यांच्यामध्ये फरक आहे, त्यामुळे मी या प्रकारची काही भूमिका घेणार नाही.
- मी महाराष्ट्रातील असा प्रतिनिधी आहे, ज्याच्या भागात सर्व धर्माचे लोक आहेत.
- मला जर राज ठाकरे यांनी भेटायला बोलावलं तर मी सांगेन की, सरकारला अल्टिमेटम द्यावा.
- जे काही आदेश आहेत त्याची अंमलबजावणी करणं हे सरकारचेही काम आहे.
- मलाही कालच पोलीस ठाण्यात बोलावून तुम्ही मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात तुम्ही काही भूमिका घेणार आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर नगरसेवक बाबर, मुसलमानांकडून विचारणा!
- राज ठाकरे यांच्या भाषणानंतर साईनाथ बाबर आणि मला प्रभागातील लोकांचे फोन येत आहेत.
- एक मुस्लीम गट मला येऊन भेटला.
- राज ठाकरे बोलतात त्याप्रमाणे आपल्या वॉर्डात मशिदींवरील भोंग्याबाबत काही होणार आहे का, असा प्रश्न त्यांनी मला विचारला.
- त्यावर मी असे काहीही होणार नाही, असे त्यांना सांगितले.
- अनेकांनी यावेळी पक्षाचा राजीनामाही दिला आहे.
- पण आम्ही कार्यकरत्यांची समजूत घालू आणि निर्णय घेऊ.
महाराष्ट्र नवनिर्माणसेनाला जय महाराष्ट्र.
हिंदू-मुस्लिम राजकारण मला आवडत नाही कारण मी एक भारतीय आहे.
जय महाराष्ट्र.— अमिन हुददा. (@AMINHudda2) April 5, 2022