मुक्तपीठ टीम
भाजपा नेते किरीट सोमय्या हे संजय राऊतांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मोर्चा वळवला आहे. ते आता जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी ईडीकडे प्रयत्न करत आहेत. मात्र, सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा करून ५८ कोटी रुपये हडपल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊतांनी केला आहे, त्यावर ते बोलत नसल्याने वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. मात्र, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेल्या पैशांचं नेमकं सोमय्यांनी काय केलं? या प्रश्नाचं उत्तर किरीट सोमय्यांनी दिलेलं नाही. याबाबतीत माध्यमांनी प्रश्न विचारण्याआधीच सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत संपवली. सोमय्या थेट जरंडेश्वर कारखाना प्रकरणी शेतकऱ्यांसोबत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
- विक्रांत प्रकरणी एक रुपयाचाही घोटाळा झाला नाही.
- मी दमडीचाही घोटाळा केला नाही.
- त्यामुळे मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे.
- संजय राऊत यांनी आरोप केले पण अद्याप ते कोणत्याही प्रकारचा पुरावा देऊ शकले नाहीत.
- एफआयआर दाखल केले आहे, पण मला अद्याप एफआयआरची प्रत मिळाली नाही.
- माझे उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की, त्यांच्याकडे असणारी माहिती त्यांनी द्यावी, मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही.
- मी चौकशीला तयार आहे.
- पोलिसांच्या कोणत्याही चौकशीचे मी स्वागत करत असल्याचे सोमय्या म्हणाले.
- दरम्यान, ठाकरे सरकारचे घोटाळे मी बाहेर काढत आहे आणि पुढेही काढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
- संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवरून सोमय्या यांनी काही पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
- यावेळी सोमय्या यांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.
- मात्र, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेल्या पैश्यांचं नेमकं सोमय्यांनी काय केलं? या प्रश्नाचं उत्तर किरीट सोमय्यांनी दिलेलं नाही.
- याबाबतीत माध्यमांनी प्रश्न विचारण्याआधीच सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत संपवली.
राऊतांनी काय आरोप केले?
- संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी पैसे जमावले.
- कोट्यवधी रुपये जमा केले.
- त्यासाठी लाखो लोकांनी पैसी दिले.
- स्वतः किरीट सोमय्यांनी ५७ ते ५८ कोटी रुपये जमा केले.
- मात्र, हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत.
- केंद्रीय तपास यंत्रणा पारदर्शक असतील, तर त्यांनी या घोटाळ्याची चौकशी करावी.
- विक्रांतसाठी जमा केलेली रक्कम कुठे गेली, याचा छडा लावावा.
- आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी विक्रांतवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील देणगी दिली आहे.
- या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी.
पत्रकारांच्या प्रश्नाला अद्याप सोमय्यांकडून अस्पष्ट उत्तर
- पत्रकारांच्या प्रश्नाला अद्याप सोमय्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही.
- मला न विचारता पोलिसांनी कलम ४२० लावलं.
- मला अटक करण्यासाठी कलम लावण्यात आले आहेत.
- ५८ कोटींचा आकडा कुठून आला हे उद्धव ठाकरेंनी सागांवं.
- आयएनएस विक्रांतबद्दल दाखल गुन्हाची कॉपी उशिरा मिळाली.
- कॉपी देण्यास टाळाटाळ सुरु होती.
- जुन्या आरोपांच राऊतांनी पुरावे का दिले नाहीत?