मुक्तपीठ टीम
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ल्याचा एफआयआरवरून आता वाद उसळला आहे. या हल्ला प्रकरणी सोमय्या यांनी जबानी दिली असली तरी एफआयआरवर सही केलेली नाही. त्यामुळे कायदेशीररीत्या त्या एफआयरला न्यायालयात महत्व नसेल. पोलीस आपल्या जबानीनुसार जसं घडलं तसा एफआयआर दाखल करत नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच पोलीस आयुक्त संजय पांडे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चपराशी असल्यासारखे वागतात, असं संतापाने सोमय्या यांनी एकेरी उल्लेख करत सुनावले आहे.
एफआयआरचा वाद!
त्याचवेळी सोमय्या यांनी पोलिसांनी हल्लाप्रकरणी दाखल केलेला एफआयआर योग्य नसून तो चुकीचा असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, त्यांनी सही केलेली नसल्याने पोलिसांनी अद्याप अधिकृत एफआयआर अद्याप दाखल केला नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
“तो पोलीस कमिश्नर उद्धव ठाकरेचा चपरासी आहे का?” – सोमय्या
- हल्ल्यानंतर पोलीस ठाण्यात पोहचलेले भाजपा नेते किरीट सोमय्या खूप संतापलेले होते. पोलीस अधिकारी त्यांना बोलवत असताना त्यांनी संताप व्यक्त केला.
- संतापलेल्या सोमय्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना झापले. ते म्हणाले, “आज संजय पांडेला यावंच लागणार.
- पोलिसांच्या सहयोगाने हल्ला केला जातो. तो उद्धव ठाकरेंचा पोलीस आहे का तो कर्मचारी? पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या सहकार्याने हल्ला केला जातो. तो पोलीस कमिश्नर उद्धव ठाकरेचा चपरासी आहे का?”
महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कोलमडली!- देवेंद्र फडणवीस
खा. नवनीत राणा यांना भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात येतोय, हे किरीट सोमय्या यांनी पोलिसांना कळविले होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे.
हल्ला होणार, हे सुद्धा त्यांनी आधीच पोलिसांना सांगितले होते. असे असताना पोलिसांनी खबरदारी घेतली नाही. पोलिसांच्या मदतीने ही गुंडगिरी सुरू आहे. pic.twitter.com/ZvauHbAf4j— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 23, 2022
भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईची मागणी केली आहे.
It’s a total collapse of law & order situation in Mumbai & Maharashtra!
Goons attacked @BJP4Maharashtra leader @KiritSomaiya ji right in front of Khar Police Station & in presence of police personnel.
This is absolutely unacceptable!
We demand strongest action !#Maharashtra pic.twitter.com/FXl7AMhQem— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 23, 2022
“मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. किरीट सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलीस ठाण्यासमोर हल्ला करण्यात आला आहे. यावेळी पोलीस तेथे उपस्थित होते. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे! कठोर कारवाईची
खा. नवनीत राणा यांना भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात येतोय, हे किरीट सोमय्या यांनी पोलिसांना कळविले होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. हल्ला होणार, हे सुद्धा त्यांनी आधीच पोलिसांना सांगितले होते. असे असताना पोलिसांनी खबरदारी घेतली नाही. पोलिसांच्या मदतीने ही गुंडगिरी सुरू आहे.मागणी!
- या घटनेने मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालविली आहे.
- हा प्रकार अतिशय गंभीर आहे.
- या प्रकरणात कठोर कारवाईची आमची गृहमंत्री आणि गृहसचिवांकडे मागणी आहे.
- आम्ही घाबरून जाऊ असे समजू नका.
- जशाच तसे उत्तर उत्तर देण्याची आमचीही क्षमता आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !!!