मुक्तपीठ टीम
भाजपा नेते किरीट सोमय्या सतत आघाडी सरकारमधील घोटाळेबाज नेत्यांचा गौप्यस्फोट करत असतात. आता त्यांनी राज्यातील आघाडी सरकारच्या चार नेत्यांनी बीटकॉइनमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केल्याचा आरोपही केला आहे. किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना लक्ष्य केले आहे.
मराठवाड्यातील चार नेत्यांचा घोटाळा उघड करणार
- मराठवाड्यातील चार नेत्यांनी २० कोटी रुपये बीटकॉईनमध्ये गुंतवले आहेत.
- ठाकरे सरकारच्या या नेत्यांचा घोटाळा उघड करण्यात येणार आहे.
- बीटकॉईनच्या ट्रान्झॅक्शनची डिटेल माझ्याकडे आली आहे.
- मी सोमवारी ईडी कार्यालयात जाणार आहे.
- या घोटाळ्याची ईडी चेअरमन आणि केंद्रीय अर्थ खात्याला त्याची माहिती देणार आहे.
ठाकरे सरकारमधील अनेक नेते आणि अधिकारी भ्रष्टाचारात
- बीटकॉईनमध्ये मोठी गुंतवणूक करणारे हे तीन ते चार नेते आहेत.
- त्यांचे एजंट समोर आले आहेत.
- अशोक चव्हाणांचे जे मित्रं आहेत, त्यातून खूप काही बाहेर येणार आहे.
- पाहुयात काय होतंय ते.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील अनेक नेते आणि अधिकारी भ्रष्टाचारात आहेत.
- परमबीर सिंग यांना निलंबित केलं तसं या आरोप असलेल्या नेत्यांनाही निलंबित करा.
काहींना जेल, तर काहींना बेल!
- अनिल देशमुखप्रकरणाचा पाठपुरावा केला.
- भावना गवळींच्या आईंवर कारवाई होणार आहे.
- अशोक चव्हाण, अर्जून खोतकर, प्रताप सरनाईक यांची ७८ एकर जागा जप्त करण्यात आली आहे.
- काही जेलमध्ये आहेत, तर काही बेलवर आहेत.
- शिवाय काही काही रुग्णालयात असणार आहेत.
यशवंत जाधव यांची अवस्था चोर मचाये शोर अशी!
- यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केली आहे.
- आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत.
- यशवंत जाधव यांची अवस्था चोर मचाये शोर अशी झाली आहे.
- मात्र, काहीही असले तरी यशवंत जाधव यांच्या चौकशीला गती देण्यासाठी पाठपूरावा करणार आहे.