मुक्तपीठ टीम
उबॉन या कंपनीने भारतीय बाजारात उबॉन एसपी ४० नावाने आपला खास ब्लूटूथ स्पीकर आणला आहे. हा स्पिकर वीजेविनाही चार्ज होऊ शकतो. हा एक सोलर ब्लूटूथ स्पीकर आहे. याला सूर्याच्या किरणांनी चार्ज केले जाऊ शकते.
हा ब्लूटूथ स्पीकर सिंगल चार्जमध्ये ४ तासाची जबरदस्त बॅटरी लाईफ देतो. उबॉन एसपी ४० स्पीकर सोलर चार्जिंग पॅनल सोबत येतो. जेव्हा वीज नसेल तेव्हा स्पीकरला सूर्यकिरणांसमोर ठेवून चार्ज केले जाऊ शकते. या स्पीकरमध्येच ड्यूएल टॉर्चही आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी १२०० एमएएचची जबरदस्त बॅटरी आहे.
उबॉन एसपी ४० ची किंमत
उबॉन एसपी ४० ब्लूटूथ स्पीकरला २,४९९ रुपये मध्ये लॉन्च केले आहे. याच्या सगळ्या प्रमुख रिटेल स्टोअर्स शिवाय ई-कॉमर्स प्लेटफॉर्म अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर खरेदी केले जाऊ शकते.
उबॉन एसपी ४० चे स्पेसिफिकेशन्स
१. उबॉन एसपी ४० ब्लूटूथ स्पीकर मध्ये यूएसबी चार्जिंग, ड्यूल टॉर्चचा सपोर्ट दिला आहे.
२. याव्यतिरिक्त एफएम रेडिओ चे ऑप्शन दिले आहे.
३. कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये स्पीकर, यूएसबी पोर्ट, माइक्रो टीएफ/एसडी कार्ड पावर्ड ट्रू वायरलेस स्पीकर दिला आहे.
४. उबॉन एसपी ४० स्पीकर वायरलेस व्ही ५.० ब्लूटूथ सपोर्ट सोबत येतो.
५. यात १० मीटरची रेंज मिळते.स्पीकर मध्ये आपल्या प्लेलिस्ट पासून सोप्या पद्धतीने एफएम मोड मधे शिफ्ट होऊ शकते.
६. तुमचे आवडीचे रेडिओ स्टेशन निवडता येते.
७. हा एक पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आहे ज्याला कुठे पण घेऊन जाऊ शकतो.
८. कंपनी चे म्हणणे आहे की उबॉन एसपी ४० ब्लूटूथ स्पीकर ग्राहकांना खूप आवडला आहे.
९. याला कुठेही घेऊन प्रवास करता येतो.