मुक्तपीठ टीम
रोहतांग पासमध्ये हिम पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तिथं जाण्यासाठी पूर्वी खास व्यवस्था नव्हती. पण आता अटल पास या भुयारीमार्गामुळे सुरक्षित प्रवासाची संधी मिळत आहे. त्यामुळे हिमनद्या, शिखरे, दऱ्यांमध्ये सौंदर्याची उधळणीची मजा पर्यटकांना उपभोगता येते.
निसर्गसौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहतांग पासचे भारतासाठी धोरणात्मक महत्त्व आहे. रोहतांग खिंड हिमालयातील पीर पंजाल पर्वतरांगेवर आहे. रोहतांग खिंड ही प्रामुख्याने हिंदू संस्कृती असलेल्या आर्द्र कुल्लू खोऱ्यातील व लाहौल आणि स्पिती खोऱ्यांमधली एक नैसर्गिक विभागणी आहे. खिंडीतून हिमनद्या, शिखरे, लाहौल व्हॅली आणि चंद्रा नदीचे सुंदर दर्शन घडते. रोहतांगवरून गेपनची जुळी शिखरेही दिसतात. मनाली, कुल्लू, लेह आणि जवळपासच्या भागांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या रोहतांग पासची संख्या वाढत आहे.
रोहतांगच्या बर्फात पर्यटक खेळत आहेत. पासमध्ये स्नो स्लेज, स्नो स्कूटर, स्नो ट्यूब, माउंटन बाइकसह फोटोग्राफीचा आनंद पर्यटक घेत आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे तेथील रहीवाश्यांचा व्यावसायही सुरू झाला आहे. मार्ही येथे बर्फाळ वाऱ्याच्या सूर्यप्रकाशात पर्यटक नाश्ता आणि दुपारच्या जेवणाचा आनंद घेत आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत हॉटेल्समधील जास्त बुकिंगमुळे व्यवसाय चांगला होण्याची शक्यता तीथल्या ट्रॅव्हल एजंटनी स्पष्ट केली आहे. दिवाळीनंतर कुल्लू मनालीला पर्यटकांचा ओघ वाढला आहे. हॉटेल व्यावसायिक यांनी स्पष्ट केले की, पर्यटकांची वर्दळ वाढल्यामुळे हॉटेल्समध्येही काम वाढली आहेत.
हॉटेल असोसिएशन मनालीचे अध्यक्ष मुकेश ठाकूर यांनी सांगितले की, अतिथी देवो भवाच्या धर्तीवर प्रत्येक हॉटेलमध्ये पर्यटकांचे स्वागत करण्यात येत आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. एसडीएम मनाली डॉ सुरेंद्र ठाकूर यांनी सांगीतले की, रोहतांग पास पर्यटकांसाठी खुला आहे. परमिट असलेली वाहनेच रोहतांगला पाठवली जात आहेत. सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांची ये-जा हवामानावर अवलंबून असेल.