Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडकोची कोरोना योध्दे-गणवेषधारी कर्मचाऱ्यांसाठी १५ नोव्हेंबरला विशेष सोडत

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
cidco

मुक्तपीठ टीम

सिडकोच्या कोरोन योध्दे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांना सोडतीमध्ये घर प्राप्त झाले नाही, परंतु योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे अशा सर्व अर्जदारांना सोडत प्रक्रीयेद्वारे सदनिका अदा करण्यात येणार आहेत. यात प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांचादेखील समावेश करण्यात येणार आहे.

 

सदर विशेष गृहनिर्माण योजनेची रचना अशा प्रकारे करण्यात आली होती की जरी अर्जदार प्रथम सोडतीत अयशस्वी ठरला तरी प्रत्येक अर्जदाराला उपलब्ध असलेल्या स्थळी सदनिका मिळेल. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य व सफाई कर्मचारी, पोलीस आणि अन्य गणवेषधारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आता उपलब्ध घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याने “प्रत्येक अर्जदारास घर” या सिडकोने दिलेल्या वचनाची पूर्तता होणार आहे, असे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

 

योजना नेमकी कशी आणि घरं कुठे?

  • कोरोना महासाथीच्या काळात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य व सफाई कर्मचारी, पोलीस आणि अन्य गणवेषधारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता, समाजाप्रति आपले कर्तव्य बजावत अनेकांचे प्राण वाचवले.
  • त्यांच्या या कार्याप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून सिडकोकडून, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑगस्ट २०२१ रोजी कोरोना योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला.
  • या योजने अंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या ५ नोडमध्ये एकूण ४,४८८ घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली.
  • एकूण ४,४८८ घरांपैकी १०८८ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर उर्वरित ३४०० घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहे.

 

या योजनेकरीता पहिली संगणकीय सोडत २९ऑक्टोबर २०२१ रोजी काढण्यात आली होती. उपलब्ध घरांसाठी आणि अनामत रकमेचा भरणा केलेल्या परंतु ज्यांना अद्याप घर वाटपित झालेले नाही अशा सर्व अर्जदारां करीता दुसरी संगणकीय सोडत उपरोक्त तारखेस काढण्यात येणार आहे. दुसऱ्या सोडतीमध्ये अर्जदारांनी ज्या ठिकाणास प्राधान्य दिले आहे त्या पेक्षा वेगळ्या ठिकाणचे घर त्यांना वाटपित केले जाऊ शकते, याची नोंद घेण्यात यावी.

 

सदर सोडत पार पडल्यानंतर वाटपित झालेल्या घरांचा स्वीकार करण्यासाठी अर्जदारांना १५ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. सोडतीद्वारे उपलब्ध झालेली सदनिका स्वीकारणे अर्जदारास बंधनकारक असणार नाही. सोडतीनंतर यशस्वी अर्जदारांच्या नावांची यादी https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: cidcoindiacovid warriorsHousing Schememuktpeethकोरोनाकोरोना योध्दे-गणवेषधारी कर्मचारीगृहनिर्माण योजनामुक्तपीठसिडको
Previous Post

रोहतांग पासमध्ये हिम पर्यटन…हिमनद्या, शिखरे, दऱ्यांमध्ये सौंदर्याची उधळण!

Next Post

सुपोषित महाराष्ट्रासाठी पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर

Next Post
Tracker App

सुपोषित महाराष्ट्रासाठी पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!