मुक्तपीठ टीम
काळ्या जादूसाठी वन्यजीवाच्या अवयवांची तस्करी आजही केली जाते. अंधश्रद्धेमुळे अशा तस्करीचे प्रमाण वाढत आहे. असाच एक प्रकार कल्याण येथे घडला आहे. वन विभागाने कल्याणमध्ये मोठी कारवाई केली आहे. एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्यूरो आणि कल्याणच्या वन विभागाच्या शाखेने छापा टाकला असून यात या २५० इंद्रजाल आणि ८० जोडी घोरपडींचे अवयव जप्त केले आहेत. या क्लिनिकमधून गीता आनंद जाखोटिया (४७) या कथित डॉक्टरसह तिचे सप्लायर नवनाथ त्रंबक घुगे (३०) आणि अक्षय मनोहर देशमुख (२२, रा. म्हारळ) या तिघांना अटक केली आहे.
Committed to end wildlife crime!
250 pieces of #SeaFan & Black #Corals and 50 pieces of #Hathajodi (Hemi Penis of Monitor Lizard) were seized and two persons were arrested by joint team of @WCCBHQ and Mumbai Forest Dept. from Kalyan (West), Mumbai, on 16-09-2021. pic.twitter.com/gI5sCTXf5k
— Wildlife Crime Control Bureau (@WCCBHQ) September 20, 2021
अशी टाकली धाड
- कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोडवरील मॅक्सी ग्राउंडसमोरील इमारतीत डॉ. जाखोटीयांचं कार्यालय आहे.
- या कार्यलयात दुर्मिळ व बाळगण्यास बंदी असलेल्या काळ्या समुद्र शैवाळाचे तुकडे व घोरपडीचे अवयव जाखोटिया असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरोला मिळाली होती.
- या माहितीच्या आधारे धाड टाकली.
- यावेळी जाखोटिया यांच्या कार्यालयात २५० काळ्या समुद्र शैवाळाचे तुकडे आणि ८० जोड्या घोरपडीचे अवयव आढळून आले.
- या पथकाने मुद्देमालासह तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
का केला जातो वन्य जीवांच्या अवयवांचा वापर
- दरम्यान इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव घरात, कार्यालयात, दुकानात ठेवल्यास सुखशांती आरोग्य आणि लक्ष्मी घरात नांदते या अंधश्रद्धेपोटी या वस्तू बाळगल्या जातात.
- काळी जादू करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.
- तर आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील या वस्तू वापरल्या जातात.
- मात्र या वस्तू जवळ बाळगण्यास किंवा त्यांची विक्री करण्यास वन्यजीव कायदा १९७२ अन्वये मज्जाव करण्यात आलेला आहे.