Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘स्मार्ट’ प्रकल्प कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरेल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

November 25, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
World Bank Delegation

मुक्तपीठ टीम

‘स्मार्ट’ प्रकल्प हा राज्यातील कृषि क्षेत्रासाठी गेम चेंजर असणार आहे. या प्रकल्पादरम्यान विकसित होणाऱ्या लिंकेजेसमुळे शेती आणि शेतकरी अधिक समृद्ध होणार आहे. राज्यातील कृषिक्षेत्र वातावरणीय बदलांना अनुकूल करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची आज राजभवन येथे भेट घेतली, यावेळी ते बोलत होते.

World Bank Delegation

यावेळी शिष्टमंडळातील शबनम सिन्हा, आदर्श कुमार, सुदीप मुजुमदार, झियांग वाँग या सदस्यांसमवेत निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंपदा विभागाचे सचिव राजन शहा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग आदी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पोक्रा-२ हा जवळपास ६०० मिलियन डॉलर्सच्या गुंतवणूक प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यात आली. कृषि क्षेत्रासाठी राज्यात स्वतंत्र फिडर असून या फिडर्सचे सोलरायझेशन करण्यात येत आहे. कृषि क्षेत्रामध्ये राज्याची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) येणाऱ्या गावांमधील देखील कृषि फिडर्स सौर ऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न आहे .

राज्यात युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या तरुणांना कौशल्य आधारित शिक्षण देण्यासाठी कौशल्य विकासाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. कौशल्य विकास विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या कौशल्य विकासाच्या विविध योजनांची ‘मित्रा’ या संस्थेशी समन्वयाने मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. वातावरणीय बदलामुळे राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये वारंवार पूर येतात, तर काही भागाला अवर्षणाचा सामना करावा लागतो. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुराचे पाणी अवर्षणग्रस्त भागात वळवण्याचा राज्याचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत कृष्णा नदी पात्रातील पुराचे पाणी भीमा नदीच्या पात्रात वळवण्याचा विचार आहे. यामुळे भीमा खोऱ्यातील १४ अवर्षणग्रस्त जिल्ह्यांना लाभ होणार आहे. पुरामुळे कोल्हापूर, सांगली भागातील ऊस लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते, या भागातील कृषि क्षेत्राला ‘स्मार्ट’ प्रकल्पाचा लाभ होऊ शकतो, असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

या बैठकीत महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प, हवामान बदल आणि त्यामुळे कृषि क्षेत्रावर होणारा परिणाम, बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, पोक्रा योजना,जलसंपदा प्रकल्प याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


Tags: Agriculture SectorDeputy Chief Minister Devendra FadnavisGovernment NewsmuktpeethSmart ProjectsWorld Bank Delegationउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकृषी क्षेत्रघडलं-बिघडलंजागतिक बँक शिष्टमंडळमुक्तपीठसरकारी बातमीस्मार्ट प्रकल्प
Previous Post

खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करुन प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

जे.जे. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मागण्या मार्गी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post
Minister Chandrakant Patil

जे.जे. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मागण्या मार्गी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!