मुक्तपीठ टीम
कोरोनाने जवळजवळ दोन वर्ष जगभरात थैमान घातले आहे. सध्या याचे प्रमाण थंडावताना दिसत आहे. परंतु, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, ब्रिटनमध्ये नुकतेच झालेले संशोधन कोरोनाबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी खूपच उपयोगी ठरू शकते. या संशोधनानुसार, स्लीप एपनिया मास्क कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटरच्या वापरापासून वाचवू शकेल.
सीपीएपी मशीन कोरोना रूग्णांना ठेवणार व्हेंटिलेटरच्या वापरापासून दूर
वॉर्विक विद्यापीठ आणि क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टच्या संशोधकांना असे आढळले आहे की, एपनिया मास्क म्हणजेच सतत पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (सीपीएपी) मशीन काही गंभीर आजारी रुग्णांना व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचवू शकतात. या थेरपीमध्ये, फुफ्फुसांमध्ये हवा पंप केली जाते जेणेकरून वरचा एअरवे कोसळू नये. म्हणजेच, ते श्वसनमार्गाचा वरचा भाग निष्क्रिय होण्यापासून प्रतिबंधित करते आणि फुफ्फुसांना दाबाने हवा पाठवते.
सीपीएपी थेरपी घेणाऱ्यांमध्ये मृत्यूचा आकडा कमी
- सीपीएपी थेरपी घेणाऱ्या लोकांमध्ये, व्हेंटिलेटरवर गेलेल्या किंवा ३० दिवसांच्या आत मरण पावलेल्या लोकांची संख्या मोठ्याप्रमाणात कमी आहे.
- सीपीएपी थेरपी घेणाऱ्या ३७७ लोकांपैकी २४० लोकांना म्हणजेच ६३% लोकांना व्हेंटिलेटरची गरज नव्हती.
आयसीयूमध्ये दाखल सीपीएपी थेरपी घेतलेल्या १२ पैकी केवळ १ रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता
- सीपीएपी थेरपी हा कोरोना रुग्णांसाठी अधिक चांगला पर्याय असू शकतो.
- ज्यांना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते, त्यांना सीपीएपी थेरपी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
एपनिया मास्क भारतासाठी एक चांगला पर्याय
- एपनिया मास्क भारतासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
- इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर नुसार, एक वर्षापूर्वी, देशात १३६.६४ कोटी लोकसंख्या असलेल्यांना सुमारे ४० हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होते.
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांच्या माहितीनुसार, देशात सध्या ५७,५१८ व्हेंटिलेटर आहेत.
- त्यापैकी अनेक लोकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या अभावामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
- अशा परिस्थितीत भारतातील लोकांसाठी एपनिया मास्क हा एक चांगला पर्याय असू शकतो.
- कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही थेरपी खूप मदत करते.
- सीपीएपी मशीनचा कंप्रेसर दाबलेल्या हवेचा सतत प्रवाह तयार करतो.
- एअर फिल्टरद्वारे ट्यूबद्वारे शुद्ध केलेली हवा रुग्णांच्या नाकाजवळ किंवा तोंडाजवळ मास्कपर्यंत पोहोचते.
कोरोना महामारी काळात या मशीनचे महत्त्व वाढले आहे. हा उपचार संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात उपयोगी पडतो आणि फुफ्फुसांचे संरक्षण करतो. सीपीएपी मास्क स्लीप एपनिया असलेल्या रुग्णांसाठी तयार करण्यात आला होता. स्लीप एपनिया ग्रस्त लोकांसाठी डिझाइन केले गेले होते, जे त्यांना झोपेत श्वास घेण्यास मदत करते.