मुक्तपीठ टीम
स्कायमेट वेदर दरवर्षी भारतातील मोसमी पावसाचा अंदाज वर्तवते. वैज्ञानिक पद्धतीने वर्तवण्यात आलेले हे अंदाज महत्वाचे असतात. यावर्षी देशात सामान्य पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. ही आपल्या शेतकर्यांसाठी खूपच चांगली बातमी आहे. स्कायमेट वेदरनुसार पावसाळ्याची सुरूवात जूनमध्ये होईल जो सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात १०३% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात ५ टक्के त्रुटी असू शकते. जूनमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत तो आपल्या नेहमीच्या वेळी पडेल. स्कायमेट वेदरचे एव्हीएम जी. पी. शर्मा म्हणाले की, “देशात हे सलग तिसरे वर्ष असेल ज्यावेळेस पाऊस सामान्य स्वरूपात पडेल. यापूर्वी १९९६, १९९७ आणि १९९८ मध्ये सलग तीन वर्षे सामान्य पाऊस पडला होता. देशाच्या बर्याच भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वायव्य राजस्थान, पंजाब आणि हरियाणा आणि देशाच्या पूर्वेकडील भागात हंगामाच्या सुरुवातीच्या काळात थोडीशी घट दिसून येईल. पंजाब आणि हरियाणामध्ये जूनमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडेल. असे मानले जात आहे की, स्कायमेटनंतर आता लवकरच भारतीय हवामान विभागदेखील आपला अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्यात महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये चांगला पाऊस पडेल, तर ईशान्य आणि कर्नाटकात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेश आणि देशाच्या पश्चिम भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडीओ: