Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कौशल्य विकास आणि रोजगाराची माहिती देणार ‘कौशल्य विकास रथ’

मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते झाला ७ रथांचा शुभारंभ

March 6, 2021
in सरकारी बातम्या
0
nawab malik

मुक्तपीठ टीम

 

केंद्र आणि राज्य शासनामार्फत कौशल्य विकासासाठी कोणकोणते अभ्यासक्रम, योजना राबविल्या जातात, याचा लाभ मिळविण्यासाठी कुठे संपर्क साधावा, महास्वयंम संकेतस्थळाद्वारे रोजगार कसा मिळवावा अशा विविध प्रश्नांसंदर्भात माहिती देण्यासाठी आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील ३५५ तालुक्यांमध्ये कौशल्य विकास रथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांचे समुपदेशनही यामार्फत केले जाणार असून यासाठी तयार करण्यात आलेल्या ७ कौशल्य विकास रथांना झेंडा दाखवून राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला.

सोच मल्टिपर्पज सोसायटीमार्फत आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या सहयोगातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी रथांच्या शुभारंभाबरोबरच ‘स्कील टु लाईव्हलीहूड कार्निव्हल’ या उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पाटील, सोच मल्टिपर्पज सोसायटीच्या सचिव पल्लवी गांगुर्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. नामदेव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शुभारंभ करण्यात आलेले कौशल्य विकास रथ हे राज्यातील ३५५ तालुक्यांमध्ये गावोगावी फिरुन जनजागृती करतील. यामध्ये प्रामुख्याने रोजगार उपलब्धतेसाठीचे https://www.mahaswayam.gov.in वेबपोर्टल, ०८०४६८७८३८१ हा टोल फ्री मीस्ड कॉल क्रमांक यांची माहिती दिली जाणार आहे. महास्वयंम वेबपोर्टलवरुन विविध कंपन्या, कॉर्पोरेट्स यामध्ये रोजगार मिळू शकतो. यासाठी नोंदणी कशी करावी, कागदपत्रे कशी भरावीत आदीसंदर्भात बेरोजगार तरुणांना माहिती दिली जाणार असून त्यांचे समुपदेशनही केले जाणार आहे. याशिवाय कौशल्य विकास विभागाच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, उपजिविकेसाठी कौशल्य संपादन ज्ञान जागरुकता अभियान, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान आदींचीही माहिती दिली जाणार आहे.

स्वयंसेवी संस्थांना शासनामार्फत संपूर्ण पाठबळ

सोच मल्टिपर्पज सोसायटी या स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तरुणांना फक्त कौशल्य प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना रोजगारही मिळणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मागील वर्षी कोरोनाचे संकट असतानाही रोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल यासह विभागाच्या विविध उपक्रमांमधून राज्यात १ लाख ९९ हजार बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. यापुढील काळातही हे सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील. यासाठी सीएसआरमधूनही मोठे सहकार्य मिळत असून सोच मल्टिपर्पज सोसायटीसारख्या विविध स्वयंसेवी संस्थाही सहकार्य करीत आहेत. सीएसआर आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या अशा सर्व उपक्रमांना शासनामार्फत संपूर्ण पाठबळ देण्यात येईल असे मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले .

राज्यात कौशल्य विकासासाठी विविध २५०० पेक्षा जास्त अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत. प्रत्येक तरुणाला कुशल बनविणे आणि त्यानंतर त्याला योग्य रोजगार मिळवून देण्यासाठी विभागाने अनेक उपक्रमांच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. आता यामध्ये सोच मल्टिपर्पज सोसायटीसारख्या स्वंयसेवी संस्थाही पुढे येत आहेत. सर्वांच्या सहकार्यातून राज्यात सर्व योजना प्रभावीपणे राबवू असे कौशल्य विकासचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह म्हणाले.

संस्थेमार्फत राष्ट्रीय पातळीवर रोजगारविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता सुरु करण्यात आलेल्या कौशल्य विकास रथामार्फत राज्यातील प्रत्येक तालुक्यात पोहोचून जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय बेरोजगार तरुणांना वैयक्तिक भेटून त्यांचे आवश्यकतेनुसार समुपदेशनही केले जाणार आहे असे सोच मल्टिपर्पज सोसायटीच्या सचिव पल्लवी गांगुर्डे यांनी सांगितले.


Tags: MaharashtraMinority Minister Nawab Malikकेंद्र आणि राज्य शासनकौशल्य विकास मंत्री नवाब मलिकमंत्री नवाब मलिक
Previous Post

फेसबुकवर कोण ठेवतंय तुमच्यावर पाळत? सोप्या ट्रिकनं डिटेक्टिव्ह व्हा!

Next Post

दर वर्षाला ५० किलो अन्न वाया घालवतो प्रत्येक भारतीय!

Next Post
Food

दर वर्षाला ५० किलो अन्न वाया घालवतो प्रत्येक भारतीय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!