मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात एक फेब्रुवारीपासून कोरोना वाढत आहे. दिवसाला सुमारे पंधरा हजार रुग्ण सापडत आहेत. हा वेग कायम राहिला तर १५ एप्रिलपर्यंत म्हणजे पुढच्या एक महिन्यात दिवसाला २५ हजार रुग्ण दिवसाला आढळतील, असा इशारा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले. त्या ई-बैठकीत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सहभागी झालेल्यांना सावध करण्यासाठी वास्तव मांडले.
लिंक क्लिक करा आणि वाचा: मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत?
मुख्य सचिव सीताराम कुंटेंचा रेड अलर्ट
- एकीकडे आम्हाला कोरोनाला पूर्णपणे रोखायचे आहे, पण असे करतांना अर्थचक्रही सुरूच ठेवायचे आहे.
- हे संतुलन राखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची खूप गरज आहे.
- १ फेब्रुवारीपासून कोरोना वाढतोय.
- आज सुमारे १५००० रुग्ण दिवसाला सापडले आहेत.
- १ लाख १० हजार सक्रीय रुग्ण राज्यात झाले आहेत.
- या वेगाने १५ एप्रिलपर्यंत २५ हजार रुग्ण दिवसाला आढळतील.
- त्यामुळे गर्दीचे नियंत्रण ठेवणे व सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे.
- सिद्धीविनायक मंदिरात तंत्रज्ञानाच्या उपयोगाने गर्दीचे कसे व्यवस्थापन केले आहे ते उदाहरण अनुकरण करावे असे आहे.
राज्यातील कोरोना संसर्ग भयावह
- आज राज्यात १५,६०२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७,४६७ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज रोजी एकूण १,१८,५२५ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २१,२५,२११ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४९% एवढे झाले आहे.
- आज नोंद झालेल्या एकूण ८८ मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे मागील ४८ तासातील
- २१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.३ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७४,०८,५०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,९७,७९३ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,७०,६९५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,०३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.