मुक्तपीठ टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पोलीस बदल्यांसंबंधित ईडीकडे कबुली दिली आहे. सिताराम कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा मोठा आरोप कुंटे यांनी केला आहे. कुंटेंनी दिलेली ही कबुली ईडीच्या आरोपांना बळकटी देतानाच अनिल देशमुखांसाठी अडचणी वाढवणारी ठरणार आहे.
सिताराम कुंटेंचा जबाब
- सिताराम कुंटे यांचा जबाब ७ डिसेंबरला ईडीनं नोंदवला होता.
- अनिल देशमुख गृहमंत्री असताना विशिष्ट पोलीस अधिकारी किंवा विशिष्ट पदांवरील बदल्यांची एक अनधिकृत यादी पाठवायचे.
- अनिल देशमुख त्यांच्या माणासांकडून विशेषत: संजीव पलांडे त्यांच्या इतर व्यक्तीकडून यादी पाठवायचे.
- ही यादी मला माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मिळायची.
- अनिल देशमुख यांच्या खात्यात काम करत असल्यानं यादीला नकार देऊ शकत नव्हतो.
- अनिल देशमुख यांनी पाठवलेली अनधिकृत बदलीची यादी पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्डाच्या सर्व सदस्यांना दाखवली जायची.
- या सर्व सदस्यांना यादी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठवल्याचं तोंडी सांगितलं जायचं.
- यानंतर ही यादी अंतिम आदेशात समाविष्ट केली जायची
सीताराम कुंटे यांची सहा तास ईडी चौकशी
- अनिल देशमुख सध्या १०० कोटी वसुली प्रकरणात तुरुंगात आहेत.
- राज्य सरकारनं नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोर देखील सुनावणी सुरु आहे.
- माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचीही ईडीकडून डिसेंबर महिन्यात चौकशी करण्यात आली होती.
- राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची सहा तास ईडी चौकशी करण्यात आली.
- अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी सीताराम कुंटेंना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं.
- या चौकशीत सीताराम कुंटे यांनी ईडीकडे अनेक गौप्यस्फोट केल्याची सुत्रांची माहिती आहे.