Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

छोटी पिन, मोठी पिन…भानगडच संपणार! आता सर्वांसाठी एकच युनिव्हर्सल चार्जर!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
USB-C

मुक्तपीठ टीम

आता लवकरच मोबाईलच्या दुनियेत एक हवीहवीशी क्रांती घडणार आहे. आतापर्यंत छोटी पिन, मोठी पिन, साधी पिन, सी पिन…अशा चार्जर भेदांमुळे त्रासलेल्या सर्व मोबाईल यूजर्सना खूश करणारी ही बातमी आहे. आता लवकरच सर्व स्मार्टफोनसाठी एकच USB-C चार्जरचा नियम अस्तित्वात येण्याची शक्यताय. त्यामुळे गॅजेट्ससाठीच्या चार्जरची किंमतही कमी होईल. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमुळे होणारे प्रदूषण देखील लक्षणीयरीत्या कमी होईल.

 

हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या भारतीय बाजारात स्मार्टफोन, इयरबड्स, टॅब्लेट, गेमिंग कन्सोलसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी ६ विविध प्रकारचे चार्जर उपलब्ध आहेत, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमती देखील वाढतात. आता तेही टळेल.

 

युरोपियन आग्रहामुळे स्मार्टफोन चार्जरमधील भेदाभेद संपणार

  • युरोपियन युनियनने अलीकडेच सर्व डिव्हाइससाठी एकाच प्रकारचे USB-C चार्जर अनिवार्य केले आहे आणि लवकरच ते बाजारात आणले जाईल.
  • युरोपियन युनियनचा असा दावा आहे की जर सार्वत्रिक USB-C चार्जर नियम लागू झाला तर दरवर्षी निर्माण होणारा ११,००० टन इलेक्ट्रॉनिक कचरा थांबेल.
  • म्हणूनच युरोपियन युनियनने (EU) सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी USB-C चार्जर वापरण्याचे आदेश देणारा ठराव पारित केला आहे.

 

भारतालाही मिळणार फायदा

  • भारत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि उपकरणांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे.
  • युरोपियन युनियनच्या या निर्णयामुळे त्याचा फायदा भारतातही होईल.
  • आपल्या देशातही लवकरच एकाच USB-C चार्जरचा नियम लागू होऊ शकेल.
  • स्मार्टफोन निर्मात्यांना दोन वर्षांच्या आत अंमलबजावणी करणे बंधनकारक असेल.

 

अॅप्पलचा एकसमान चार्जरला विरोध

  • अॅप्पल कंपनीने युनिव्हर्सल यूएसबी-सी चार्जर लागू करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.
  • अॅप्पलच्या मते असे केल्याने नवीन शोधांचे प्रयत्न थांबतील.

 

सध्या फक्त स्मार्ट फोन आणि लहान गॅजेटसाठीच

  • काही तज्ञांनी वायरलेस चार्जिंग हा एक चांगला पर्याय असल्याचा दावा केलाय.
  • USB-C चार्जरचा नवीन नियम केवळ स्मार्टफोन आणि लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी लागू होईल.
  • सध्या लॅपटॉप आणि इतर मोठ्या उपकरणांचा यात समावेश करण्यात आलेला नाही.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: smart phoneuniversal chargerUSB-C चार्जरअॅप्पलयुरोपियन युनियनस्मार्ट फोन
Previous Post

तरंगत्या शेतीचा भन्नाट प्रयोग, पुरामुळे होणाऱ्या हानीलाही आळा, पिकांचाही फायदा!

Next Post

वांद्रे स्टेशन होणार मस्त हाय-फाय! पंचतारांकित हॉटेल आणि कार्यालयेही असणार!

Next Post
bandra

वांद्रे स्टेशन होणार मस्त हाय-फाय! पंचतारांकित हॉटेल आणि कार्यालयेही असणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!