Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

December 7, 2022
in घडलं-बिघडलं
0
singer Suhasini Nandgaonkar joins Congress party

मुक्तपीठ टीम

ख्यातनाम कमी व माजी आमदार शांताराम नांदगावकर यांच्या स्नुषा आणि खानदेशचे प्रख्यात डॉ. चितळे यांची कन्या पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत दादर येथील टिळक भवन या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी नाना पटोले म्हणाले की, “सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे लोकांचा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे. काँग्रेसच्या विचाराला माननारे लोक राज्यात मोठ्या प्रमाणात आहेत. देश तोडण्याचे काम काही पक्ष व संघटना करत असताना देश जोडण्याची भूमिका घेऊन मा. खा. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ऐतिहासिक पदयात्रा सुरु केली आहे. तोडणाऱ्यांपेक्षा जोडणारे महत्वाचे असतात ही लोकांची भावना आहे. काँग्रेस विचाराने प्रभावित होणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे,” गायिका सुहासिनी नांदगावकर यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करुन काँग्रेस प्रदेशाध्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

“काँग्रेस हाच सर्व जाती-धर्मांना सामावून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणारा पक्ष आहे. मागास, वंचित, दलित समाजाच्या विकासाचे काम काँग्रेस सरकारनेच केले परंतु सध्या देशातील परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. दलित, मागास, पीडित समाजाचा विकास व्हायचा असेल तर काँग्रेस पक्षच करु शकतो याचा विश्वास असल्यानेच मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून एक कलाकार म्हणून कलाकारांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठीही काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न करेन.”असे गायिका सुहासिनी नांदगावकर यांनी म्हटले आहे.

अशी ही बनवाबनवी, तू सुखकर्ता, गोडी गुलाबी, हिंदी चित्रपट सैनिक, स्टंटमन, छोटा सा घर आदी चित्रपटात त्यांनी गाणी गायली आहेत. ३० वर्षांपासून त्या पार्श्वगायन क्षेत्रात कार्यरत असून देश विदेशातही त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. संगीत शिक्षिका म्हणूनही त्यांनी काम केले आहे.


Tags: CongressSuhasini Nandgaonkarकाँग्रेसपार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर
Previous Post

जी-20 परिषद : महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती आणि प्रगती जागतिक पातळीवर पोहोचवण्याची संधी!

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

Next Post
MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!