Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संगीतकार बप्पी लहिरी यांचं निधन! डिस्कोचा जमाना गाजवत तालावर नाचवलं…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bappi lehari

मुक्तपीठ टीम

ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनीसांगितले की, “लहिरी यांना महिनाभर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. पण घरी आल्यानंतर त्यांनी प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करावं लागलं. Obstructive Sleep Apnea (ओएसए) आणि चेस्ट कंजेशन या आजारामुळे बप्पी लहिरी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 

बप्पी लहिरींचा अल्प परिचय:

  • आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते.
  • बप्पी लाहिरी हे चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते.
  • बापी लाहिरी यांना भारतातील गोल्ड-मॅन म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी सोन्याच्या दागिन्यांच्या प्रेम अमेरिकन रॉक-स्टार एल्विस प्रेस्लीशी यांच्या सोबत जोडलेले आहे.
  • त्यांचा जन्म १९५२ मध्ये कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा असलेल्या कुटुंबात झाला.
  • त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी संगीत दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
  • त्यांचे वडील, अपरेश लाहिरी हे एक प्रसिद्ध बंगाली गायक होते आणि त्यांची आई बन्सरी लहिरी संगीतकार आणि गायिका होत्या ज्या शास्त्रीय संगीत आणि श्यामा संगीतात पारंगत होत्या.

 

बप्पी लहरींचा संगीतमय प्रवास

  • तिला दादू (१९७२) या बंगाली चित्रपटात गाण्याची पहिली संधी मिळाली.
  • मात्र, त्यांनी नन्हा शिकारी (१९७३) या चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली.
  • ताहिर हुसैन यांच्या जख्मी (१९७५) या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलीवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आणि पार्श्वगायक म्हणून ठसा उमटवला.
  • बप्पी लाहिरी यांनी १९७०-८० च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली.
  • त्यांनी भारतीय चित्रपटात सिंथेसाईज डिस्को संगीताचा वापर लोकप्रिय केला आणि स्वतःच्याही काही रचना गायल्या. त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, गँग लीडर, सैलाब यासारख्या सिनेमांतील त्यांची गाणी प्रचंड गाजली होती.
  • २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी ३ चित्रपटात ‘भंकस’ नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे ऐकायला मिळाले होते.
  • बप्पी लाहिरी यांनी २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला.

 

बाप्पी लाहिरी यांची गाजलेली बॉलिवूड गाणी

  • याद आ रहा है तेरा प्यार
  • तम्मा तम्मा लोगे
  • झुबी झुबी
  • आज रपट जाये तो
  • बम्बई से आया मेरा दोस्त
  • दे दे प्यार दे
  • ऊलाला ऊलाला (डर्टी पिक्चर)
  • रात बाकी, बात बाकी
  • यार बिना चैन कहा रे
  • तुने मारी एंट्रिया

Tags: Bappi LahiriGolden Manmumbaiगोल्डन मॅनबप्पी लहिरीमुंबई
Previous Post

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ५४ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर; राज्य सरकारने कारवाई करावी!: नाना पटोले

Next Post
nana patole

संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर; राज्य सरकारने कारवाई करावी!: नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!