Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

अनाथांची माई सिंधुताईंच्या जाण्यानं सारेच व्याकूळ…पोरकं करून गेल्याची भावना!

January 5, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
sindhutai sapkal last rituals in pune

मुक्तपीठ टीम

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या अखेरच्या दर्शनासाठी पुण्यात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लेकरांनी गर्दी केली आहे. समाजातील सर्वच थरातील ही लेकरं आपल्या माईच्या आठवणीनं व्याकूळही झाल्याचं दिसतंय. कोरोना संकटकाळातही थेट काहीही संबंध नसणारेही असंख्यांचीही तिथं रिघ लागली आहे.

 

समाजातील अनाथांना मायेचा आधार देणाऱ्या सिंधुताईंचे मंगळवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनाथांची माय अशी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्रवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सध्या सिंधुताई यांच्या पार्थिवावर दुपारी १२ वाजून १० मिनीटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल येथे महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार दफणविधी केला जाईल.

सिंधुताईंच्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव मांजरीच्या बाल सदन संस्थेत

  • सिंधुताई सपकाळ यांनी शेवटच्या श्वासापर्यंत Siअनाथ मुलांना वाढवलं.
  • मात्र त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
  • आज सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे.
  • त्याआधी त्यांचे पार्थिव सकाळी ९ वाजता नोबल हॉस्पिटलमधून मांजरी येथे नेले जाणार आहे.
  • त्यानंतर सकाळी ९ ते ११ पर्यंत मांजरीच्या बाल सदन संस्थेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल.

१२ वाजता होणार अंत्यसंस्कार

  • अंत्यदर्शनाची वेळ संपल्यानंतर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल या भागात त्यांच्यावर महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातील.
  • त्यांच्या पार्थिवावर दफनविधी केला जाईल.

 

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून ताईंना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सिंधुताई सपकाळ या त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी कायम स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नामुळे अनं अनाथ मुलं चांगलं जीवन जगू शकली. त्यांनी उपक्षेत समाजासाठी मोठं काम केलं आहे. त्यांच्या निधनामुळे दु:ख झालं. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती, असं ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Dr. Sindhutai Sapkal will be remembered for her noble service to society. Due to her efforts, many children could lead a better quality of life. She also did a lot of work among marginalised communities. Pained by her demise. Condolences to her family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/nPhMtKOeZ4

— Narendra Modi (@narendramodi) January 4, 2022

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 4, 2022

 

उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानं समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचं मातृछत्र धरणारी माय हरपली आहे.समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. pic.twitter.com/3FbuErIi5x

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 4, 2022

 

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे.
अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 4, 2022

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. सिंधुताई यांच्या निधनाची वार्ता समजली, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सिंधुताई यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो मुलांचा सांभाळ केला. समाजातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. असे गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ज्येष्ठ समाजसेविका व ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला.

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 4, 2022

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे आली, मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही, जीद्दीने सर्व संकटाचा सामना केला असे ट्विट राज्यपालांनी केले आहे.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

‘वात्सल्यसिंधू, अनाथांची माय अशा अनेक शब्दांनी देश ज्यांना ओळखत होता. भारत सरकारने नुकतंच ज्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. अशा खऱ्या अर्थानं मातृतुल्य सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानं एक खूप मोठी पोकळी तयार झाली आहे. त्या केवळ अनाथांच्या माय नाही तर अनेक महिलांसाठी त्या प्रेरणा होत्या. अगदी आयुष्य संपवण्यापासून ते अनाथांची माय बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. मला त्यांना अनेकदा भेटण्याची संधी मिळाली. मी मुख्यमंत्री असताना त्या आपल्या प्रकल्पाशी संबंधित अनेक विषय घेऊन यायच्या. त्यांच्या वागण्यातील जे वात्सल्य होतं, त्यामुळे प्रत्येकाला ती आपली आईच वाटायची. त्यामुळे आज खरोखर एक माता आपल्यातून निघून गेली आहे. समाजातील शेवटच्या माणसासाठी काम करणारं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं आहे. ही क्षती कधीही भरुन येणारी नाही. दुसऱ्या सिंधुताई होणे नाही. पण आता त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचं कार्य आपल्याला पुढे घेऊन जावं लागणार आहे’, अशा भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे.
मूळ विदर्भात, वर्ध्यात जन्मलेल्या सिंधूताईंचे आयुष्य अतिशय खडतर, पण त्यांनी त्या संघर्षातून समाजातून अव्हेरल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. pic.twitter.com/Y3XEpDnJWl

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 4, 2022

 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पद्मश्री सेवाव्रती सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन झाल्याचे समजले. अतिशय खडतर संघर्षाला सामोरे जात त्यांनी अनाथ मुलांवर मायेचे छत्र धरले होते. आज त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे. या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली! सिंधुताईंच्या जीवनावर आधारित ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा चित्रपटही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. आप्त-स्वकीयांकडून नाकारल्यानं अनाथ ते अनाथांची नाथ हा सिंधुताईंचा प्रवास थक्क करणारा आहे. आज सिंधुताई अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत. त्यांना विनम्र अभिवादन आणि विनम्र आदरांजली. अनंत हाल-अपेष्टा सोसूनही हजारावर अनाथांच्या माई झालेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ अनेकांना पोरकं करून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत. सिंधुताईंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण, अहिल्याबाई होळकर आदींसह सातशेवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सिंधुताईंच्या जीवनावर आधारित ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा चित्रपटही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. आप्त-स्वकीयांकडून नाकारल्यानं अनाथ ते अनाथांची नाथ हा सिंधुताईंचा प्रवास थक्क करणारा आहे. आज सिंधुताई अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत. त्यांना विनम्र अभिवादन आणि विनम्र आदरांजली.

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 4, 2022

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

‘बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं, पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला…’ असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोहोच पावती देणारी अनाथांची माय, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे. निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द माई!
माईंच्या जाण्याने अनाथ, दीन-दुबळ्यांचे हक्काचे आशा स्थान काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण आदरांजली माई…

‘बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं, पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला…असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोहोच पावती देणारी अनाथांची माय, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे. निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द माई! pic.twitter.com/rpNiDBDR8S

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 4, 2022

 

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला
महाराष्ट्राची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली..!

माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला
महाराष्ट्राची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली..! pic.twitter.com/L5huoQgpMQ

— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 4, 2022


Tags: punesindhutai sapkalपुणेशासकीय इतमामात अंत्यसंस्कारसिंधुताई सपकाळ
Previous Post

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भावाविरोधात ॲट्रॉसिटीसह फवणूकीचा गुन्हा दाखल

Next Post

ऊर्जा खात्यातील रिक्त पदे भरण्याबाबत बेरोजगार अभियंत्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन

Next Post
रोजगार

ऊर्जा खात्यातील रिक्त पदे भरण्याबाबत बेरोजगार अभियंत्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!