मुक्तपीठ टीम
‘श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये’ या ‘वेब सिरीज’चे पहिले पर्व २० भागांचे होते, त्यात ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ यांच्या जन्माचे प्रयोजन आणि बापनाचार्य, सुमती महाराणी, अपलराज शर्मा यांच्या करावी श्री दत्त महाराजांनी त्यांच्याच अवताराची योजना कशी अमलात आणवून घेतली हे पहायला मिळाले. त्याच बरोबरीने तत्कालीन पिठापूर मधील ब्राम्हण सभेचे अध्यक्ष नरसावधानी हे स्वतः दत्त भक्त असून देखील श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जन्माविषयी संपूर्ण पिठापुरात बापनाचार्य, सुमती महाराणी आणि अपलराज शर्मा यांच्या विरोधात सूर लावून त्यांना पिठापूर मधून कायमचे हद्दपार करण्याची भूमिका घेतली, परंतु श्रीपाद यांचा जन्म ठरल्याप्रमाणे झाला, त्यामुळे नरसावधानी यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांच्या करवी अक्षम्य अशा चुका होत गेल्या हे पहायला मिळाले.
या वेब सिरीजच्या दुसऱ्या पर्वात आपल्याला श्रीपाद राजे यांच्या जन्मानंतर दोन वर्षांचे झाल्या नंतर च्या घटना आणि बाल श्रीपादांच्या लीला पहायला मिळणार आहेत. यात स्वतः श्रीपाद राजे यांच्या साठी दुधाची समस्या निर्माण होते आणि त्या समस्ये चे निराकरण करण्यासाठी त्यांचे आप्तेष्ट कोणकोणत्या मार्गांनी टी समस्या सोडवायचा प्रयत्न करतात हे पाहायला मिळेल, त्याच प्रमाणे दुसरीकडे नरसावधानी सोबत श्रीपाद राजेंचा विरोध करीत त्यांचे अस्तित्व अमान्य करीत कोण कोण काय काय व्यूह रचतात ते पहायला मिळेल. आणि सरते शेवटी या सर्व प्रतिकूल परिस्थितीतून सुमती महाराणी आणि बापनाचार्य श्रीपादांच्या नामाने कसे निभावून नेतात ते अनुभवायला मिळेल.
साधारण ७०० वर्षांपूर्वीचा काल दाखविणाऱ्या या संपूर्ण सिरीजचे शुटींग कोकणातील निसर्गरम्य वातावरणात सुरु असून तिथले ग्रामस्थहि या दत्त भक्ती चा आनंद घेत आहेत. या सिरीज चे निर्माते आणि दिग्दर्शक असित रेडीज यांनी कोकणातील अनेक कलाकारांची निवड या सिरीज मधील पात्रांसाठी केली आहें. कोकणातील या कलाकारांचे चेहरे प्रेक्षकांसाठी नवीन असल्यामुळेच या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करू लागल्यात.
या मालिकेच्या चित्रीकरणासाठी अडीचशे वर्षांपुर्वीचा वाडा, प्राचीन मंदिरे, नद्या, डोंगर, जंगले अशी खरी खुरी स्थळे निवडली आहेत.
यातील सादरीकरणाच्या खरेपणामुळेच कि काय प्रेक्षक दुसऱ्या पर्वाची अगदी आतुरतेने वाट पहात होते. प्रेक्षकांच्या उंचावलेल्या अपेक्षा आणि वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या मालिकेचे दुसरे पर्व अल्प विश्रांती नंतर लगेच प्रेक्षकांच्या भेटीला आणले गेले आहें. दुसऱ्या पर्वातील ११ भागांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या बाल रूपातील लीला पहायला मिळतील. तेव्हा पहायला विसरू नका “श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये” …आपल्या “अवधूत चिंतन” या ओटीटी व्यासपीठावर.