Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘कालजयी सावरकर’ लघुपटाची निर्मिती!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
Kaljayi SAvarkar

मुक्तपीठ टीम

दादर येथील प्लाझा सिनेमाचे हाऊसफुल झालेले प्रिव्हियू थिएटर आणि पत्रकारांसोबतच्या संवादातून झालेले सावरकरांच्या कालजयी विचारांचे जागरण याला निमित्त होते ‘कालजयी सावरकर’ या लघुपटाचे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष प्रिव्हियू स्क्रिनिंगचे ! या कार्यक्रमाला जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. विवेक समूहाची निर्मिती असलेल्या ‘कालजयी सावरकर’ या लघुपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र आणि त्यांचे प्रखर राष्ट्रवादी विचार मांडण्याचा अतिशय स्तुत्य प्रयत्न झाला आहे आणि याचा मला आनंद वाटतो अशी बोलकी प्रतिक्रीया जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी लघुपट संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
याप्रसंगी लघुपटातील अभिनेते मनोज जोशी, सौरभ गोखले आणि तेजस बर्वे यांच्यासह इतर सहकलाकार आणि तंत्रज्ञ ही उपस्थित होते. लघुपटाचे स्क्रिनिंग झाल्यानंतर प्रश्नोत्तरादरम्यान बोलताना लघुपटाचे दिग्दर्शक गोपी कुकडे म्हणाले की, ‘क्रिएटीव्हीटी अर्थात कलात्मकता ही माध्यम बदललं तरी त्याचं मूळ बदलत नाही त्यामुळे गेली ३० हून अधिक वर्ष जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर आता लघुपटाच्या माध्यमात काम करताना फारसे अवघड गेले नाही.

KALJAI SAVARKAR (5)

यावेळी निर्माते आणि विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर सुद्धा उपस्थित होते त्यांनीही पत्रकारांना संबोधित करून आपली या लघुपटामागील निर्मितीची संकल्पना मांडली. लवकरच हा लघुपट विविध संस्थांच्या माध्यमातून गावा – गावात आणि शहरा – शहरात भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या वर्षाचे औचित्य साधून दाखवला जाणार आहे.

KALJAI SAVARKAR (1) KALJAI SAVARKAR (2)

या लघुपटात पारतंत्र्यातील हिंदुस्थानच्या भूमिकेत अभिनेते मनोज जोशी यांनी तर नवभारताची भूमिका तेजस बर्वे या अभिनेत्याने साकारली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रमुख भूमिकेत सौरभ गोखले यांनी विलक्षण लीलया पेलली आहे. यासोबतच प्रमोद पवार(लोकमान्य टिळक), अपर्णा चोथे(यमुना सावरकर), पायल गोगटे(येसू वहिनी), लिना दातार(ताई दातार), शंतनू अंबाडेकर(स्वातंत्र्यवीर सावरकर – वय १७), जयोस्तु मेस्त्री(स्वातंत्र्यवीर सावरकर-वय ११), हृषिकेश भोसले(गणेश (बाबाराव) सावरकर), रुता पिंगळे(मादाम कामा), पवन वैद्य(श्यामजी कृष्ण वर्मा), मोहित वैद्य(इंग्रज गुप्तहेर), विनोद पवार, प्रितेश कोसबे आणि इतर सहकलाकारांनी अभिनय केला आहे. जेष्ठ दिग्दर्शक गोपी कुकडे यांचं दिग्दर्शन लाभलेल्या या लघुपटाची संकल्पना दिलीप करंबेळकर यांची असून सृजन-दिग्दर्शक विनोद पवार यांचे तर संहिता डॉ. समिरा गुजर, अमोघ पोंक्षे यांची आहे. छायाचित्रण दिनेश कंदरकर, पार्श्वसंगीत अमित विलास पाध्ये, संकलन समीर अन्नारकर, किरण चव्हाण, संशोधन सहाय्य अक्षय जोग, कला दिग्दर्शन अजित दांडेकर, वेशभूषा पूर्णिमा ओक, रंगभूषा सुहास गवते, केशभूषा नर्गिस आणि निर्मिती व्यवस्थापन जयेश मिस्त्री यांची आहे.

KALJAI SAVARKAR (7)KALJAI SAVARKAR (6)


Tags: Amrit MahotsavdadarKaljai SavarkarShort Filmकालजयी सावरकरदादरलघुपटस्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव
Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी

Next Post

भारतभरात ५,००० इलेक्ट्रिक बसेसचा ताफा! स्विच मोबिलिटी आणि चलो यांचा परस्परसहयोग!!

Next Post
collaboration between Switch Mobility And chalo

भारतभरात ५,००० इलेक्ट्रिक बसेसचा ताफा! स्विच मोबिलिटी आणि चलो यांचा परस्परसहयोग!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!