Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राणागिरीमुळे शिवसेनेचा फायदा! सत्तेवर असतानाही शिवसेना सळसळली, तेजस ठाकरेही शिवसैनिकांसोबत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shivsena Aggressive

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम

नारायण राणेंच्या घरावरील मोर्च्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर तशीच सळसळती आक्रमक शिवसेना दिसली. मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेना ज्या स्टायलीसाठी ओळखली जाते ती शिवसेना स्टायलीत शिवसैनिक आक्रमकतेने सरसावताना दिसले. अमरावतीतील खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीत हनुमान चालिसा पठनाचा इशारा दिल्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी त्यांना स्वत:च्या घरातूनच बाहेर पडू दिले नाही. सत्तेवर असल्याने थंडावलेली शिवसेना पुन्हा सळसळत आहे. त्यामुळे एकप्रकारे राणागिरी ही शिवसेनेच्या फायद्याचीच ठरल्याचं दिसत आहे.

 

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर पोहोचू, असे सांगितले होते. त्यामुळे शुक्रवारपासून मुंबईत राणांविरुद्ध शिवसेना आक्रमक झाली आहे. शुक्रवारपासून शिवसैनिक मातोश्रीवर ठिय्या मांडून बसले आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र तेजस ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.

 

तेजस ठाकरेंकडून शिवसैनिकांची विचारपूस…

  • ठाकरे कुटुंबातील व्यक्तींची भेट ही शिवसैनिकांचा उत्साह वाढवणारी ठरू शकते.
  • मातोश्रीबाहेर रात्रभर अनेक शिवसैनिक ठिय्या मांडून होते.
  • मध्यरात्रीच्या सुमारास तेजस ठाकरे अचानक मातोश्रीबाहेर आले आणि त्यांनी थेट शिवसैनिकांची विचारपूस केली.
  • तेजस ठाकरे काही काळ याठिकाणी खुर्ची घेऊन बसले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी मोकळेपणाने संवाद साधला.
  • शुक्रवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील ‘मातोश्री’वर प्रवेश करताना शिवसैनिकांशी थोडा वेळ का होईना पण संवाद साधला होता.
  • या सगळ्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवी उर्जा आली आहे.

 

शिवसैनिकांकडून गुंडगिरी रवी राणांचा आरोप…

  • दरम्यान, राणा दाम्पत्याने आपण शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर पोहोचू, असे सांगितले होते.
  • मात्र अद्याप ते मातोश्रीवर पोहोचलेले नाही. शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरु आहे.
  • आमच्या घरावर हल्ला होतोय तरी आम्ही मातोश्रीवर जाणाराच असे आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्ह करत सांगितले.
  • हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही.
  • महाराष्ट्र कुठे चालला आहे.
  • महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहे.
  • आम्हाला कोणी रोखू नये असे रवी राणा म्हणाले.

Tags: cm uddhav thackerayMatoshrimumbaiRavi RanaShivsenaTejas Thackerayतेजस ठाकरेमातोश्रीमुंबईशिवसेना
Previous Post

समता परिषदेची कोकण विभागाची बैठक, ओबीसी म्हणून एक राहण्याचे भुजबळांचे आवाहन

Next Post

#मुक्तपीठ #Live मुंबईत शिवसेनेचा राडा! ठाकरे सरकारविरोधात भाजपा आक्रमक!

Next Post
#मुक्तपीठ #Live  मुंबईत शिवसेनेचा राडा! ठाकरे सरकारविरोधात भाजपा आक्रमक!

#मुक्तपीठ #Live मुंबईत शिवसेनेचा राडा! ठाकरे सरकारविरोधात भाजपा आक्रमक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!