Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरेंच्या शरीराची हालचाल बंद, शिवसेना फोडायच्या हालचाली झाल्या सुरु!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या खासदार संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीतील स्फोटक आरोप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uddha Thackeray Interview

मुक्तपीठ टीम

शिवसेनेत बंडखोरीसाठी एक महत्वाचं कारण सतत सांगितलं जातं, ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे बाहेर पडले नसल्याचं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत याच काळातील धक्कादायक आरोप केले आहेत. कोरोनाचा संकट काळ होता, या काळात उद्धव ठाकरे यांच्यावर काही शस्त्रक्रियाही झाल्या. मुलाखतीत शस्त्रक्रियेविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणालेत, “शस्त्रक्रियेनंतर एकदा मानेखालील शरीराची हालचाल बंद पडली होती. काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या!”

काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले !!

  • मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडले नाहीत असा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला.
  • या काळात उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया देखील झाल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे राज्यभर फिरले नाहीत, असंही सांगण्यात आलं.
  • मुलाखतीत शस्त्रक्रियेविषयी बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले. ‘शस्त्रक्रियेनंतर एकदा मानेखालील शरीराची हालचाल बंद पडली होती.
  • “काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते.
  • आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत.
  • मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता.
  • माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या.
  • शिवसेनेकडे आम्ही पक्ष नव्हे परिवार म्हणून पाहिलं.
  • ज्यांना पक्ष संभाळायला दिला त्यांनीच विश्वासघात केला.

भाजपाला शिवसेना संपवायची आहे !!

  • २०१९ च्या बोलणीप्रमाणे भाजपने आता केलं आहे.
  • हे आधीच केलं असतं तर देशभर पर्यटनाची गरज पडली नसती.
  • हजारो कोटीचा खर्च करण्याची वेळ आली नसती.
  • आधी केलं असतं तर भाजपाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं.
  • भाजपाला शिवसेना संपवायची आहे
  • भाजपाला हिंदुत्वात भागीदारी नको असेल.
  • परंतु शिवसेनेचं राजकारण हिंदुत्वाच्या मजबुतीसाठी आहे.
  • तर भाजपचं हिंदुत्व राजकारण करण्यासाठी आहे.
  • मी हिंदुत्वविरोधी काय केलं हे दाखवून द्यावं.
  • अयोध्येत महाराष्ट्र भवन हे आम्ही केलं.
  • नवी मुंबईत तिरुपती मंदिरासाठी जागा दिली.
  • प्राचीन मंदिरांचा विकास केला.
  • असं कोणतं काम हिंदुत्वविरोधी केलं.

अन्याय तिथे वार, हेच शिवसेनेचे ब्रीदवाक्य !!

  • शिवसेना आणि संघर्ष हे पाचवीला पुजलेलं आहे.
  • शिवसेना ही तळपती तलवार, ती म्यानात राहू शकत नाही.
  • संघर्षासाठीच शिवसेना जन्माला आली.
  • अन्याय तिथे वार, हेच शिवसेनेचे ब्रीदवाक्य.
  • शिवसेना आणि ठाण्याचं नातं तोडता येणार नाही.
  • पालापाचोळा शिवसेना आणि ठाण्याचं नातं तोडू शकत नाही.
  • महाराष्ट्र आता फक्त निवडणुकांची वाट बघतोय.
  • युती करताना काय ठरलं याचे करार जनतेसमोर ठेवा.
  • निवडणूक आयोगाने असा नियम करावा.

महाविकास आघाडीमध्ये समन्वय आणि सभ्यता होती…

  • भाजपाने शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्म नसता.
  • लाखो लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
  • आता निवडणुका घ्या, चूक केली असेल तर घरी बसवतील.
  • ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रासाठी काम करत आहे.
  • घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला.
  • तसंच बंडखोरांना वेगळा गट स्थापन करता येणार नाही. बंडखोरांना कुठल्या तरी पक्षात जावं लागेल.
  • बंडखोर कुठल्या पक्षात गेले तर भाजपाची पंचाईत होईल.
  • माझा माईक कधी कुणी खेचला नाही.
  • महाविकास आघाडीमध्ये समन्वय आणि सभ्यता होती.

माझे वडील का चोरत आहात?

  • शिवसैनिकांमध्येच लढाई लावण्याचा भाजपाचा डाव आहे.
  • भाजपाला शिवसेना-ठाकरे हे नातं तोडायचं आहे.
  • पक्षाप्रमाणे आदर्श पळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
  • ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा
  • माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका.
  • स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावून मतं मागा.
  • तसंच माझे वडील का चोरत आहात?
  • बाळासाहेबांवरुन संभ्रम का निर्माण करत आहात.

मुख्यमंत्री केलं असतं तर यांनी काय वेगळं केलं असतं?

  • देशाच्या घटनेवर, कायद्यावर माझा विश्वास आहे.
  • चोरीमारी सगळीकडेच चालते असं नाही.
  • असं असेल तर सत्यमेव जयते हे वाक्य पुसावं लागेल.
  • एकतर असत्यमेव जयते किवा सत्तामेव जयते हे करावं लागेल.
  • पुरावे नाही द्यावे लागत जनताच यांना पुरुन टाकतील.
  • जनताच आता निवडणुकीची वाट बघत आहे.
  • जनताच बंडखोरांना पुरुन टाकेल.
  • मलाई खाण्यासाठी मी मुख्यमंत्रिपदी नव्हतो.
  • स्वतःकडे कोणतीही मोठी खाती ठेवली नव्हती.
  • एका मंत्र्याने दिवा लावला म्हणून ते खातं माझ्याकडे आलं होतं. परिवारातले समजून विश्वास ठेवला हीच माझी चूक झाली.
  • त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर यांनी काय वेगळं केलं असतं?
  • त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय.
  • स्वतःची तुलना शिवसेनाप्रमुखांशी करत आहेत.
  • सध्या सुरु आहे ती राक्षसी महत्वाकांक्षा आहे.
  • याला हावरटपणा म्हणतात.

विश्वासघातकी आईलाच गिळायला निघाले…

  • महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर जनतेने उठाव केला असता.
  • मविआच्या कामावर जनता आनंदी होती.
  • कामामुळेच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव होतं.
  • घराबाहेर न पडताही देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये नाव आलं होतं.
  • मी घराबाहेर पडलो की गर्दी होते.
  • त्यावेळी घराबाहेर न पडणं ही काळाची गरज होती.
  • सामान्यातून आता असामान्य घडवण्याची वेळ आली.
  • चला उठा पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य घडवू.
  • त्यांना मी ताकद दिली ही माझी चूक झाली.
  • राजकारणात जन्म दिला त्यांना गिळायला निघालेली ही औलाद आहे.
  • विश्वासघातकी आईलाच गिळायला निघाले आहेत.
  • निष्ठा कधीच विकली जाऊ शकत नाही.
  • दिल्लीत गेले नाही तोपर्यंत बाळासाहेबांनीच वाचवलं.
  • ज्यांनी जन्म दिला त्यांनाच का संपवायला निघाले आहेत.

Tags: Maharashtrasanjay rautShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेमहाराष्ट्रशिवसेनासंजय राऊत
Previous Post

बंडखोरीनंतरचा लाव्हा! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत

Next Post

#मुक्तपीठ #liVE सोनिया गांधींची ईडी चौकशी, काँग्रेसचा महाराष्ट्रासह देशभरात सत्याग्रह!

Next Post
#मुक्तपीठ #liVE   सोनिया गांधींची ईडी चौकशी, काँग्रेसचा महाराष्ट्रासह देशभरात सत्याग्रह!

#मुक्तपीठ #liVE सोनिया गांधींची ईडी चौकशी, काँग्रेसचा महाराष्ट्रासह देशभरात सत्याग्रह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!