मुक्तपीठ टीम
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपा नेते किरीट सोमय्या त्यांच्यावर सातत्याने टीका करायचे. आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतरही किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करणे सोडलेले नाही. सोमय्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा देत माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्या बदल अभिनंदन, अशी टीका केली. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना माफिया शब्द वापरल्याने बंडखोर गटातील आमदार संतापले आहेत.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
- किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
- या भेटीचे फोटो ट्वीट करत ‘या मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हटविल्या बदल अभिनंदन केले, अशी टीका केली. या ट्विटमध्ये किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंसाठी माफिया शब्द वापरल्याने बंडखोर गटातील नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले @NeilSomaiya@BJP4Maharashtra pic.twitter.com/Z0oe7kSFta
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 7, 2022
बंडखोर आमदारांचा सोमय्यांच्या वक्तव्यावर तीव्र अक्षेप…
- सोमय्यांच्या वक्तव्यावर बंडखोर गटातील आमदाप दीपक केसरकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
- आम्ही ज्यावेळी मुंबईत परत आलो तेव्हा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सर्व आमदार यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सर्व आमदारांची बैठक झाली.
- देवेंद्र फडणवीस त्या बैठकीत उपस्थित होते.
- त्या बैठकीत आमच्या नेत्यांबद्दल, उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य करण्यात येऊ नये अशी मी विनंती केली होती.
- देवेंद्र फडणवीस यांनी ती विनंती मान्य केली होती.
- ज्येष्ठ नेत्यांबद्दल कोणतही वक्तव्य काढू नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं.
- याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतू तो होऊ शकला नाही.
- मात्र देवेंद्र फडणवीसांना आक्षेप कळवण्यात आला आहे.
- किरीट सोमय्या हे भाजपाचे नेते असल्यानं देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलतील.
किरीट सोमय्यांचे स्पष्टीकरण!
- शिंदे गटाने यावर आक्षेप नोंदवल्यानंतर किरीट सोमय्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.
- मी एकनाथ शिंदेंना भेटलो त्यांचं अभिनंदन केलं.
- उद्धव ठाकरेंनी मला आणि माझ्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती.
- याशिवाय नवनीत राणांनाही तुरुंगात टाकले होते, त्यामुळे मी त्यांना माफिया म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं.