Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मुंबईतील जर्जर इमारतींचे पुनर्विकास विधेयक राष्ट्रपतींकडे सहा महिने पडून!”

तातडीने मंजुरी देण्याची शिवसेनेची राष्ट्रपतींकडे मागणी

June 15, 2021
in घडलं-बिघडलं
0
Shivsena

मुक्तपीठ टीम

जुन्या व मोडकळीस आलेल्या तसेच उपकरप्राप्त इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ सुधारणा विधेयक सप्टेंबर २०२० मध्ये महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने मंजूर झाले. परंतु दुर्दैवाने हे विधेयक राष्ट्रपती कार्यालयात मंजुरीसाठी गेले सहा महिने प्रतिक्षेत आहे.

 

शिवसेना आमदार अजय चौधरी हे या विषयाचा सतत पाठपुरावा करत असतात. यांनी हा विषय शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत यांच्या निदर्शनास आणताच त्यांनी गंभीर दखल घेतली आणि यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. सदर विधेयक रहिवाशांच्या जिवाचे रक्षण करण्यास किती महत्त्वाचे आहे याची विस्तृत माहिती या पत्रात दिली आहे.

 

मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्विकासाकडे मालक दुर्लक्ष करतात असे अनेकदा दिसून आले आहे. त्याचप्रमाणे अनेक इमारतींचा पुनर्विकास विकासकांनी अर्धवट सोडल्याने रहिवाशी हैराण झाले आहेत. अशा इमारती ताब्यात घेऊन त्यांचा पुनर्विकास करण्याचे अधिकार या विधेयकामुळे म्हाडाला मिळणार आहेत. इमारतींचा पुनर्विकास करण्यास ५१ टक्के रहिवाशांची संमती, जमीन मालकाला नुकसानभरपाई अशाही तरतुदी या विधेयकात आहेत असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

मुंबईतील उपकरप्राप्त १६ हजार इमारतींमधील अनेक इमारती या १०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. काही इमारती या मुंबई पोर्ट ट्रस्ट, एनटीसी, एलआयसी आदींच्या जमिनींवर आहेत. त्यांची दुरुस्ती वेळोवेळी होत नाही आणि पुनर्विकासासाठी त्या इमारती म्हाडाच्या ताब्यात देण्यास संबंधित सरकारी संस्था तयार होत नाहीत. या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यास त्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा होणार असल्याचे खासदार सावंत यांनी या पत्रामध्ये निदर्शनास आणून दिले आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा किंवा त्यांचा पुनर्विकास पंतप्रधान आवास योजनेतून व्हावा अशीही मागणी आपण संसदेत केली होती याचाही उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे.


Tags: mumbaiPresident Ramnath Kovindprime minister narendra modiअजय चौधरीखासदार अरविंद सावंतपंतप्रधान नरेंद्र मोदीराष्ट्रपती रामनाथ कोविंद
Previous Post

राज्यपालांनी स्वतःकडे ठेवली आहे विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी

Next Post

आज पुन्हा १० हजाराखाली नवे रुग्ण, १५ हजारावर बरे होऊन घरी परतले!

Next Post
MCR 1-5-21

आज पुन्हा १० हजाराखाली नवे रुग्ण, १५ हजारावर बरे होऊन घरी परतले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!