Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शिवसेना आणि रुग्णवाहिका हे नाते प्रत्येक संकटात अबाधित” – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

आमदार रमेश कोरगावकर यांनी 'एस' वॉर्डसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांचं लोकार्पण

May 11, 2021
in घडलं-बिघडलं
0
eknath shinde

मुक्तपीठ टीम

कोरोनाची रुग्णसंख्या सध्या कमी होत असली तरीही गाफिल राहून चालणार नाही. आगामी काळात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे व तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे कोरोनाचा पुर्ण नायनाट होईपर्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचं मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. शिवसेनेचे भांडुपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी एस वॉर्ड साठी दिलेल्या २ रूग्णवाहिका आज त्यांच्या हस्ते प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते.

 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची लॉकडाऊनची सूचना अंमलात आणल्याने कोरोनाचे रुग्ण कमी होण्यात यश मिळत आहे. त्यामुळे सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे पालन करावे अस आवाहन शिंदे यांनी केले. शिवसेनेचे व रुग्णवाहिकेचे कायमच एक वेगळे नाते आहे. संकटकाळात सर्वांना शिवसेनेच्या रुग्णवाहिका आठवतात आणि त्यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वैद्यकीय सहाय्य मिळते. अभिनेता अमिताभ बच्चन यांना जेव्हा रुग्णवाहिकेची गरज भासली तेव्हा देखील त्यांना शिवसेनेचीच रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.

shivsena

कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपल्या सगळ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. रुग्णालयात बेड मिळवण्यापासून प्रत्येक बाबीसाठी अनेकांना धावपळ करावी लागली मात्र काही काळानंतर कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने कोरोनाचे संकट गेल्यासारखे वाटले. मात्र प्रत्यक्षात पुन्हा कोरोनाची लाट आली त्यामुळे आता कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी गाफिल राहून चालणार नाही. सरकारच्या निर्देशांचे पालन करुन सुरक्षित राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.

 

आमदार रमेश कोरगावकर यांनी आमदार निधीतून हा चांगला समाजोपयोगी उपक्रम राबवला आहे. रुग्णवाहिकेचा वापर कमीत कमी व्हावा अशीच सर्वांची इच्छा आहे. मात्र जेव्हा रुग्णाला रुग्णवाहिकेची गरज भासेल तेव्हा तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होईल, याकडे लक्ष देण्याची सूचना मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

shivsena

यावेळी आमदार रमेश कोरगावकर, आमदार सुनील राऊत, माजी खासदार संजय पाटील, महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा राजराजेश्वरी रेडकर, प्रभाग समिती अध्यक्षा दिपमाला बढे, नगरसेविका दिपाली गोसावी, सुवर्णा करंजे, महिला विभाग संघटक संध्या वढावकर, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विभास आचरेकर उपस्थित होते.

 

 


Tags: amitabh bacchanchief minister uddhav thackerayEknath ShindeShivsenaअमिताभ बच्चनरमेश कोरगावकर
Previous Post

सातारच्या सैनिक स्कूलमध्ये नर्सिंगच्या जागांसाठी संधी

Next Post

“कोविशिल्डप्रमाणेच कोवॅक्सिनचंही महाराष्ट्रात उत्पादन होणार! भारत बायोटेकच्या प्लान्टसाठी तातडीने जागा मिळणार”

Next Post
ajit pawar

"कोविशिल्डप्रमाणेच कोवॅक्सिनचंही महाराष्ट्रात उत्पादन होणार! भारत बायोटेकच्या प्लान्टसाठी तातडीने जागा मिळणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!