Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार, प्रत्यक्षात लाभ कोण घेतं…पवार सरकार!” – गजानन किर्तीकर

शिवसेना नेते गजानन किर्तीकरांनीही शिवसैनिकांची खंत जाहीर मांडल्यानं खळबळ

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gajanan Kirtikar

मुक्तपीठ टीम

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधी वाटपावेळी सर्वात जास्त निधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांना त्यानंतर कॉग्रेसच्या मंत्रांच्या खात्यांना मिळाले. मात्र शिवसेनेच्या मंत्र्याच्या खात्यांना केवळ १६ टक्के निधी मिळाल्याने नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. केवळ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार, अशी टीका त्यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाला खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते पार पडलेय.

 

आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते? पवार सरकार…

  • एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात, असं किर्तीकर म्हणाले.
  • विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ / १५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहावयास मिळते.
  • आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. मात्र, निधीची पळवापळवी केली जात असून आता, केवळ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार, अशी टीका करत किर्तीकरांनी घरचा आहेर दिला आहे.

किर्तीकर योगेश कदमांच्या पाठीशी

  • अंतर्गत भेदीही खूप आहेत त्यांचाही त्रास होतो, हा त्रास मुंबई शहरात एवढा होत नाही.
  • मात्र, इकडे जास्त आहे असे म्हणत त्यांनी तुला तो भोगायला लागते आहे असे त्यांनी योगेश कदम यांना सांगितले.
  • आपण तुझ्या पाठीशी आहोत असा धीरही त्यांनी आमदार योगेश कदम यांना दिला.
  • या कार्यक्रमात खासदार किर्तीकर यांच्या हस्ते आमदार योगेश कदम यांचा सत्कारही करण्यात आला.
  • माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील मोबाइलवरील कथित संभाषण उघड झाल्यावर शिवसेनेतून रामदास कदम व त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांना कॉर्नेर करण्याचा प्रयत्न केला जात असून दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडीचे अधिकार आमदार योगेश कदम यांना न देता ते माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना देण्यात आले होते.
  • योगेश कदम यांच्या गटाचे असलेले शिवसेनेचे तालुकाध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, विधासभा क्षेत्र प्रमुख यांची उचलबांगडी करून तेथे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पालकमंत्री अनिल परब यांनी केली होती.
  • त्यामुळे योगेश कदम यांना पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागत असल्याचं चित्र आहे.

Tags: @GajananKirtikarDapolidevelopment fund allocationMaharahstraShivsenaगजानन किर्तीकरदापोलीनिधी वाटपमहाराष्ट्रशिवसेना
Previous Post

#महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधानसभा २१ मार्च २२ (१)

Next Post

#महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधानपरिषद २१ मार्च २२ (२)

Next Post
#महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधानपरिषद २१ मार्च २२ (२)

#महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधानपरिषद २१ मार्च २२ (२)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!