मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना ऑनलाइन संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख या भूमिकेतून नवी दिशा दाखवली. ते म्हणाले की आपण लोकसभा, विधानसभा गंभीरतेने घेतो, पण स्थानिक निवडणुकांमध्ये का कमी पडतो, याचा विचार करा. फक्त बेंडकुळ्या फुगवू नका. गावागावात आपल्याला संस्थात्मक काम उभं करावं लागेल. तसंच भाजपाशी युती सोडली असली तरी हिंदूत्व सोडलेले नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच मागे ईडीवगैरे लावण्यापेक्षा थेट भिडण्याचं आव्हानही भाजपाला दिले.
जर आपण सर्वच राज्यांमध्ये आपण निवडणूक लढवत आहोत. आपण खरं हिंदूत्व घेऊन पुढे जायचं. लढायचं. जिंकू किंवा हरू. जसा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत घडलं तसा आपलाही दिवस येईल.
आता ज्या निवडणुका झाल्या, त्या आपण सर्वत्र लढवल्या नाहीत. कुठे आघाड्या होत्या. नव्हत्या. आपण नंबर चारवर आहोत. पण किती जागा लढवल्या? आजवर मिळवल्या त्यापेक्षा जास्त जागा मिळवल्या. पण आपण लोकसभा, विधानसभेसारख्या जिद्दीने लढवत नाही. आपले नेते, लोकप्रतिनिधी या स्थानिक निवडणुकांकडे लक्ष देत नाहीत. आपले नेते, त्यात मीही येतो. स्थानिक निवडणुकांकडे लक्ष देत नाही. इतर पक्षांचे नेते, मग भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आहेत त्यांचे नेते स्थानिक उमेदवारांना मदत करतात. तशी आपणही केलीच पाहिजे.
दोन विधानपरिषदा आपण हरलो. काहीजण सांगतात आपल्यातच गद्दारी आहे. मला वाटत नाही आईच्या दुधाशी गद्दारी करणारी अवलाद शिवसेनेत राहिलेली नाही. पण जर तसे असतील तर त्यांनी जावे. मुठभर राहिले तरी चालतील. जे असतील त्यांच्याबळावर लढू. मला वाटते गद्दारी नाही पण दुर्लक्ष होत आहे.
ज्या प्रमाणे आपले प्रतिस्पर्धी, आपले साथी आहेत, त्यांनी गावागावात संस्थात्मक कामे केली आहेत. आपण संस्थात्मक काय काम करत आहोत? मी मुख्यमंत्री आहेत. इतर सर्व लोक येतात, संस्था पाहिजेत. बाकीची इतर लोक गावामध्ये संस्था पाहिजेत, असं करतात. मग सभासद येतात. ते बांधून राहतात. संस्थात्मक कामे केली पाहिजेत. तीही नियमबाह्य नाही, अशी कामे आपण केली पाहिजेत. नुसते दंड थोपटून दाखवायचे, बेंडकळ्या फुगवायच्या. एकहाती, दोन हाती सत्ता बोलायचे. तसे नको. आपण