Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राणेंच्या आक्षेर्पाह वक्तव्यानंतर शिवसैनिक पेटले, ‘कोंबडी चोर, मेंटल हॉस्पिटल’पासून वाट्टेल ती लाखोली!

August 24, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
narayan rane (2)

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चांगलेच गोत्यात आले आहेत. सोमवारी महाडमध्ये जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान त्यांनी कानाखाली लावण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया येत आहेत. लाखो शिवसैनिक आक्रमक झाले असून पुणे, नाशिक आणि महाडमध्ये राणेंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर भाजपाकडून त्यांचे समर्थन केले जात आहे.

 

राणे-सेना वाद चिघळणार #NarayanRane यांच्या #UddhavThackarey @CMOMaharashtra यांच्यावरील वक्तव्यानंतर युवासेना आक्रमक
दादर भागात अशी पोस्टर्स लावण्यात आली होती. पोलिसांनी पोस्टर्स हटवली आहेत @bbcnewsmarathi pic.twitter.com/L5VIUHY2aW

— Mayank Bhagwat (@mayankbhagwat) August 24, 2021

गुलाबराव पाटील

  • राज्यभरात शिवसेनेकडून नाराणय राणेंचा निषेध सुरु आहे.
  • पुणे, नाशिक आणि महाडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • दरम्यान शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील नारायण राणेंवर टीका केली आहे. “मला वाटतं नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे.
  • एक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री…ज्यांनी ही पदं भोगली आहेत, या पदाचा सन्मान त्यांना माहिती आहे.
  • मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा तो संपूर्ण राज्याचा असतो.
  • राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे.
  • जर ते नसेल तर त्यांना रुग्णालयात दाखल केलं पाहिजे आणि वेळ आली तर शॉकदेखील दिला पाहिजे,” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

 

अमेय घोले

  • केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.
  • या वक्तव्यानंतर मध्यरात्रीच स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात पोस्टरबाजी केली होती.
  • मात्र पोलिसांनी अवघ्या एक तासात हे पोस्टर हटवले आहेत.
  • राणेंविरोधात लावलेले हे पोस्टर जरी काढून टाकले असले तरी या पोस्टर्सचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.
  • या पोस्टरमध्ये राणेंचा क्लोजअप फोटो लावून त्याच्या बाजूला कोंबडी चोर असं लिहिण्यात आलं आहे. याखाली पोस्टर लावणारे नगरसेवक घोले यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

 

अतुल भातखळकर

  • शिवसैनिकांनी राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला असला तरी भाजपाने मात्र राणेंना पाठिंबा दर्शविला आहे.
  • भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी ट्विट करत पाठींबा दर्शविला आहे.
  • भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लिहिले की,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे बाण वर्मी लागलेले दिसतायत.
  • मोगलाई सरकार भाजपा नेत्यांची मुस्कटदाबी करून जनतेचा आक्रोश दाबण्याचा प्रयत्न करतेय.

 

केंद्रीय मंत्री @MeNarayanRane यांचे बाण वर्मी लागलेले दिसतायत. मोगलाई सरकार भाजपा नेत्यांची मुस्कटदाबी करून जनतेचा आक्रोश दाबण्याचा प्रयत्न करतेय. pic.twitter.com/vCUJS7lhh8

— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 24, 2021

नितेश राणे

  • केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर मुंबईत त्याचे पडसाद पाहायला मिळाले आहेत.
    यावर राणे यांचे पुत्र नितेश राणेंनीही ट्वीट केले आहे.
  • राणे यांच्या खळबळजनक वक्तव्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेनेच्या युवासनेच्या कार्यकरत्यांना राणेंच्या जुहूमधील घराबाहेर जमण्यास सांगण्यात आल्याचं नितेश यांनी रात्री एक वाजून १० मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
  • नितेश राणेंनी केलेल्या ट्विटमध्ये, “युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहूमधील घराबाहेर गोळा होण्यास सांगण्यात आल्याचं ऐकलं.
  • मुंबई पोलिसांनी त्यांना इथे येण्यापासून थांबवावे किंवा त्यांनी थांबवलं नाही तर जे काही होईल ती आमची जबाबदारी नसेल.
  • सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत,” असं नितेश राणेंनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

 

Hearing the news of Yuva Sena members been told to gather outside our Juhu house..
either Mumbai police stops them from coming there or whatever happens there will be not our responsibility!!
Don’t dare to walk into the lions den !
We shall be waiting!

— nitesh rane (@NiteshNRane) August 23, 2021

 

वाट्टेल ते बोलून नारायण राणे अडचणीत,शिवसेनेकडून संताप, गुन्हे दाखल!

 


Tags: atul bhatkhalkarcm uddhav thackerayShivsenaअतुल भातखळकरअमेय घोलेगुलाबराव पाटीलजन आशीर्वाद यात्रानितेश राणेमहाडमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

वाट्टेल ते बोलून नारायण राणे अडचणीत,शिवसेनेकडून संताप, गुन्हे दाखल!

Next Post

“मोदी सरकारची कामे जनतेपर्यंत नेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा”

Next Post
bjp

"मोदी सरकारची कामे जनतेपर्यंत नेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!