Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मोदी सरकारची कामे जनतेपर्यंत नेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

August 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
bjp

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ७ वर्षांत अनेक लोकोपयोगी योजना आखल्या आहेत. या योजना सामान्य माणसापर्यंत पोहचवून आणखी चांगले काम करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आल्या, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले.

 

पाली ( जि. रायगड ) येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या कोकणातील प्रवासाला पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर याप्रसंगी उपस्थित होते.

 

पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करताना महाराष्ट्रातील ४ जणांचा समावेश करत देशात महाराष्ट्राला सर्वाधिक प्रतिनिधित्व दिले. मोदी सरकारच्या जन कल्याणकारी योजना जनतेपर्यंत नेण्याबरोबरच जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आणि आणखी चांगले काम करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा सुरु आहे. नारायण राणे यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या खात्याच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राच्या विकासाला नक्की चालना मिळेल.

 

केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे भारताची मान जगात उंचावली आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा जाणून घेऊन जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.

 

आपल्यावर सोपविण्यात आलेल्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्याच्या माध्यमातून रोजगार वाढविणाऱ्या योजना आपण सुरु करू, असेही त्यांनी नमूद केले.

 

दरम्यान, राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.


Tags: chandrakant patilNarayan raneNarendra modiPaliचंद्रकांत पाटीलजन आशीर्वाद यात्रानारायण राणेपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

राणेंच्या आक्षेर्पाह वक्तव्यानंतर शिवसैनिक पेटले, ‘कोंबडी चोर, मेंटल हॉस्पिटल’पासून वाट्टेल ती लाखोली!

Next Post

“राज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक”

Next Post
amit deshmukh

"राज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!