मुक्तपीठ टीम
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईला आले आहेत. गनिमी काव्याने राणा दाम्पत्य आज पहाटे मुंबईतील खार इथल्या निवस्थानी पोहोचलं आहे. त्यावरून राजकीय वातावरण चांगलंचं तापलं आहे. राणा दाम्पत्यांच्या या इशाऱ्यावरून शिवसैनिकांनी यापाठी भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला आहे.
भाजपाच्यावतीने आखलेला हा कट आहे- विनायक राऊत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं होतं की, मी पुन्हा येईन पण ते झालं नाही. आणि म्हणून राज्य शासनाच्या सत्तेवर बसावं अशी अतृप्त राहिलेली त्यांची इच्छा दिल्लीच्या भाजपाच्या नेत्यांनी करू शकले नाहीत म्हणून महाविकास आघाडीला अस्थिर करायचं त्रास द्यायचा यासाठी भाजपाच्यावतीने आखलेला हा कट आहे. यापाठी जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत, असे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी सांगितले आहे.
हे सर्व भाजपा करतेय -वरुण सरदेशाई
- दोन दिवसांपूर्वी त्यांनी आम्हाला आव्हान दिलं होतं आणि तेव्हा देखील आम्ही म्हणालो होतो की मातोश्री हे प्रत्येक शिवसेनेसाठी मंदिरासमान आहे.
- आणि कोणी जर आमच्या मंदिरावरती आक्रमण करण्याचं आव्हान करणार असेल तर शिवसैनिक हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
- हे सर्व मुद्दामून केलं जात आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे.
- जनतेचा आजचा सर्वात महत्वाचा प्रश्न हा इंधरदर वाढ आणि महागाई आहे, आणि कुठेतरी या प्रश्नांपासून जनतेचं लक्ष विचलित करायचं यासाठी विविध मुद्दे काढायचे हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.
- राणा दाम्पत्यांनी एकदातरी मातोश्री बंगल्यावर या आणि आमचा प्रसाद घ्यावा.
- देशात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रिय झाले आहेत आणि म्हणून भाजपाच्या पोटामध्ये मोठा गोळा आलेला आहे.
- त्यांना भीती वाटत आहे की, उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता एवढी वाढलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबांवर वारंवार बोलत राहायचं स्वत: न बोलता प्याद्यांना बोलायला लावायचं अशी त्यांची रणनीती आहे.
- हे सर्व भाजपा करतेय हे सर्वांना माहित आहे.
नेमकं प्रकरण काय?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या बंगल्याबाहेर हनुमान चालीसाचं पठण केलं जाईल, असे राणा दाम्पत्यांनी इशारा दिला आहे.
- या दोघांसोबतच युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्तेही मुंबईत पोहोचले आहेत.
- सकाळी रस्ते मार्गाने त्यांचे कार्यकर्ते मुंबईत आल्याची माहिती आहे.
- त्या पार्श्वभूमीवर मातोश्री आणि वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे.
- पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे.