Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नविन्यपूर्ण उपक्रम योजना फ्लॅगशीप योजना म्हणून राबविण्यात याव्यात – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

April 22, 2022
in सरकारी बातम्या
0
Balasahebh Thorat

मुक्तपीठ टीम

प्रशासनात सहजता, गतिमानता, पारदर्शकता  असली पाहिजे. गतिमानता आणण्यासाठी कालानुरूप प्रशासनात बदल केले जातात. जिल्ह्यात राज्यात जे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात ते राज्यभर राबविले गेले पाहिजेत. महसूल विभागात अनेक योजना राजस्व अभियान अंतर्गत राज्यभर राबविल्या जातात. नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यासाठी मुख्यमंत्री फ्लॅगशीप योजना म्हणून राबविण्यात याव्यात, असे  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

            

महसूल मंत्री थोरात म्हणाले, शासनाने मोफत घरपोच सातबारा, ऑनलाइन फेरफार, ई पीक पाहणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा विनामूल्य व घरपोच दिला जात आहे. गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

 

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा‘ हे अभियान राबविण्यात येते. या अभियानातंर्गत सहभाग तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना / उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.

 

या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत प्राप्त पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावर विजय वाघमारे, सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव या वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार दिपेंन्द्र सिंह कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, मुंबई, पारितोषिकाचे स्वरुप रोख  दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, द्वितीय पुरस्कार राहुल द्वीवेदी प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई, पारितोषिकाचे स्वरुप रोख. सहा लाख रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, तृतीय पुरस्कार  राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक, पारितोषिकाचे स्वरुप रोख  चार लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

 

विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर , पारितोषिकाचे स्वरुप रोख  दहा लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, द्वितीय पुरस्कार अनिरूद्ध बक्षी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ, पारितोषिकाचे स्वरुप रोख सहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, तृतीय पुरस्कार एस.एस.शेवाळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, राहता, अहमदनगर पारितोषिकाचे स्वरुप रोख चार लाख रु.,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

 

महानगरपालिका वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पारितोषिकाचे स्वरुप रोख  दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार राधाकृष्ण बी.,आयुक्त, नागपूर महानगरपालिका, पारितोषिकाचे स्वरुप रोख सहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार  दिलीप ढोले, आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका पारितोषिकाचे स्वरुप रोख  चार लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

          

सर्वोकृष्ट कल्पना अंतर्गत शासकीय संस्था वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार  गिरीश वखारे, तहसिलदार, तहसिल कार्यालय, तळोदा, नंदुरबार ,पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार मंदार कुलकर्णी, तहसिलदार,  तहसिल कार्यालय, नवापूर, नंदुरबार पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार निमा अरोरा, जिल्हाधिकारी अकोला पारितोषिकाचे स्वरुप रोख  वीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

 

शासकीय अधिकारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार डॉ. राजेंद्र बी. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर, पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव, पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार एकनाथ बिजवे, नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ, पारितोषिकाचे स्वरुप रोख  वीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आला.

 

शासकीय कर्मचारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार अजय राजाराम लोखंडे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, भडगाव नगरपरिषद, भडगाव, जळगाव,पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार निशीकांत सुर्यकांत पाटील, तलाठी, पारोळा शहर, तलाठी कार्यालय पारोळा, जळगाव, पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, देण्यात येणार आहे.

 

यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी केले.


Tags: balasahebh thoratflagShip SchemeInnovative venture planनविन्यपूर्ण उपक्रम योजनाफ्लॅगशीप योजनामहसूलमंत्री बाळासाहेब थोरात
Previous Post

#मुक्तपीठ #Live “जेलमधील नवाब मलिक आजही मंत्री कसे?” – केशव उपाध्ये

Next Post

राणांविरोधात शिवसैनिक आक्रमक! सूत्रधार भाजपा – फडणवीसच असल्याचा आरोप!!

Next Post
Shivsainik Protest Against Rana Couple

राणांविरोधात शिवसैनिक आक्रमक! सूत्रधार भाजपा - फडणवीसच असल्याचा आरोप!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!