Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माजी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळरावांचा अभिमन्यू काळेंच्या बदलीला जाहीर विरोध

April 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
patil

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीच्या काळात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवड्यासाठी जबाबदार ठरवत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे. ही बदली भाजपा नेत्यांना रेमडेसिविरची परवानगी देण्यावरून झाल्याचे बोलले जाते. राज्य सरकारने केलेल्या या बदलीला शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विरोध केला आहे. अभिमन्यू काळे यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांची बदली अतिशय चुकीची आणि निषेधार्ह आहे, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचेच असताना शिवसेनेच्याच माजी खासदाराने केलेल्या या विरोधामुळे वेगळी चर्चा रंगली आहे.

शिवाजीराव आढळराव काय बोललेत?

  • अभिमन्यू काळे यांना मी जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहित नजरेसमोर ठेवून, त्यांनी आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे.
  • त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरं जावं लागलं आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.
  • मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एका प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या तडकाफडकी बदलीला माझा ठाम विरोध आहे.
    जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्याला माझा जाहीर पाठिंबा आहे.

 

अभिमन्यू काळे यांची बदली का झाली?

  • रेमडेसिविरच्या पुरवठ्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण रंगलं आहे.
  • रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात अपयश आल्याच्या कारणावरून अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
  • त्यांच्या जागी परिमल सिंग यांच्याकडे एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  • एफडीए आयु्क्त काळे यांनी रेमडेसिविरसाठी भाजपाला दिलेल्या पत्रामुळे देखील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नाराज होते.
  • काळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यानंतर काळे यांची बदली करण्यात आली.
  • मुळात त्यांच्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मंत्र्यांचा विरोध होता.
  • त्यांच्याजागी हरिष बैंजल या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला नेमण्याचा आग्रह धरण्यात आला होता. मात्र, राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीने विरोध करत तसे होऊ दिले नव्हते.

Tags: abhimanyu kaleshivajirao adhalrao patilअभिमन्यू काळेकोरोनाभाजपमुख्यमंत्री उद्धव ठाकरेरेमडेसिविर इंजेक्शनशिवाजीराव आढळराव पाटील
Previous Post

कोरोना संकटावर दिलीप कुमार यांनी काय म्हटलं?

Next Post

गल्ली ते दिल्ली…रुग्णालयेच मृत्यूचे सापळे! राजकारणाचे विषाणू मारा! लोकांचे जीव वाचवा!!

Next Post
virar

गल्ली ते दिल्ली...रुग्णालयेच मृत्यूचे सापळे! राजकारणाचे विषाणू मारा! लोकांचे जीव वाचवा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!