मुक्तपीठ टीम
हनुमान चालिसा पठन आंदोलनामुळे तत्कालीन सत्ताधाऱ्यांसाठी राजकीय संकट निर्माण करून देशभर गाजूणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणाच आता संकटात सापडल्या आहेत. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट काढण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुलुंड पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या संकटातून वाचण्यासाठी खासदार राणा आता कुणाचा धावा करणार, अशी चर्चा रंगली आहे.
नवनीत राणांच्या अडचणीत वाढ!!
- खासदार नवनीत राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली आहे.
- मात्र सत्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिलेली नाही.
- त्यामुळे आता शिवडी न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झालीय.
- शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट काढत कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
- ७ नोव्हेंबर रोजी याप्रकरणाची पुढील कारवाई होणार आहे.
- तोपर्यंत नवनीत राणा यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
नेमकं प्रकरण काय?
- नवनीत राणा यांनी आपल्या शपथपत्रामध्ये दिलेलं जात प्रमाणपत्र खोटं आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
- याविरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदरराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
- त्यानंतर उच्च न्यायालयाने जून २०२१मध्ये नवनीर राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द देखील केलं होतं.
- शिवाय दोन लाखांचा दंडही ठोठावलेला.
- मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती.
- दरम्यान, नवनीत राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
- त्यानंतर जून २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती दिलेली.
नवनीत राणांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल!!
- नवनीत राणा यांच्या वडिलांविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे.
- त्यांनी फसवणूक करुन जात प्रमाणपत्र मिळवलं असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
- जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बोगस दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणांवर आहे.
- याप्रकरणी नवनीत राणांसह त्यांच्या वडिलांवरही मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.