Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भाजपच नंबर १! कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला हा समज खोटा ठरविला!!”

भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंचा दावा

January 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
keshav upadhye

मुक्तपीठ टीम

 

“कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे म्हटले जाते. कोकणात शिवसेनेशिवाय कुणी दुसरं जिंकत नाही. पण या ग्रामपंचायत निवडणुकीत कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला हा समज कोकणी मतदारांनी खोटा ठरवला. भाजपाला भरभरून मतदान दिलं. तसेच राज्यात भाजपच नंबर १ पक्ष आहे” असा दावा भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सुरु असताना केला आहे.

 

केशव उपाध्येंच्या दाव्यानुसार, “सिंधुदुर्गमध्ये ७० पैकी ५५ च्या आसपास ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. देवगडमध्ये २३ पैकी १७ भाजपाने जिंकल्या आहेत. वैभववाडीत १२ पैकी ९ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. स्थानिक शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी तळेगाव ग्रामपंचायत दत्तक घेतली होती, ही ग्रामपंचायत देखील भाजपाने जिंकली आहे. मालवणमधील सहा पैकी पाच ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. कुडाळमधील पाच पैकी चार ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.”

 

“पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशाप्रकारचा समज गेली अनेक वर्षांपासून आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्या पाठिशी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालं.” असल्याचेही यावेळी केशव उपाध्ये यांनी सांगितले.

 

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. राज्यातील चार प्रमुख पक्षांमध्ये चुरस असल्याचे दिसत आहे. त्यात माध्यमांमधील बातम्यांमध्ये शिवसेना क्रमांक १चा पक्ष झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देण्यासाठी भाजपाकडून पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.


Tags: BJPBJP keshav upadhyeGram Panchayat Electiongrampanchayat resultsग्रामपंचायत निकालग्रामपंचायत निवडणूकभाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये
Previous Post

आता काँग्रेसचाही दावा…”चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीवर आमचाच झेंडा!”

Next Post

“पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत घोटाळा! पुणे, औरंगाबादमध्ये बोगस मतदार!”

Next Post
chandrakant Patil -1

“पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत घोटाळा! पुणे, औरंगाबादमध्ये बोगस मतदार!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!