Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

बदलापूर ते पंढरपूर…शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष पेटला!

February 8, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
shivsena and BJP

मुक्तपीठ टीम

 

पक्के मित्र, पक्के वैरीही होतात…सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच घडताना दिसत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप या दोन पूर्वीच्या मित्रांमध्ये संघर्ष पेटत आहे. जुन्या दोस्तांच्या नव्या दुष्मनीमुळे स्थानिक राजकारणात रक्तचरित्रम् अध्याय सुरु झाला आहे. बदलापुरात ग्रामपंचायत निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाला काळे फासल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणीही भाजपने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप केला आहे.

 

पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी भाजपाच्या एका माजी शहराध्यक्षाच्या तोंडाला काळे फासून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रशांत जगताप नावाच्या शिवसेना कार्यकर्त्यांने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी शिवसेना आता गुंडगिरीच्या मार्गाने दहशत पसरवत असल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी शिवसैनिकांना याआधी हल्ला केलेल्या भाजप कार्यकर्त्यांसह राज्यपालांचीही भेट घेतली. आणि आता पंढरपुरातील हल्लेखोर शिवसैनिकांविरोधात व्हिडीओ पुरावा असल्यानं कडक कारवाईची मागणी केली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनीही कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

 

शिरीष कटेकर या भाजपा च्या दलालाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर केलेली खालच्या पातळीवरील टिका केली शिवसेना पंढरपुर शहर च्या पदाधिकाऱ्यानी त्याला साडी, बांगड्याचा हार आणि बुक्का लावून काळे फासले व शिवसेना स्टाईल ने चोप देण्यात आला..🔥💪
औकातीत रहा..😏 pic.twitter.com/uXjRFIOX8a

— Prashant Jagtap 🇮🇳🚩🏹 (@IMJagtapPK_9) February 6, 2021

 

शिवसैनिकांनी कटेकर यांना भर रस्त्यात तोंडाला काळे फासून विठ्ठल मंदिर परिसरात धिंड काढली. तसेच कटेकर यांना मारहाण केली. पंढरपूर शहराचे माजी भाजप अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती, त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी, आम्ही त्यांना दणका दिल्याचा शिवसैनिकांचा दावा आहे. हा प्रकार घडत असताना तेथे पोलीस उपस्थित होते, हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये दिसत आहे.

 

भाजपाचे नेते किरीट सोमैया सातत्याने शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी पंढरपूर ला शिवसेनेच्या गुंडांनी भाजपा चा कार्यकर्त्याची मारहाण केली, शिवसेनेच्या त्या ९ गुंडांना ताबडतोब अटक करावी अशी मागणी केली आहे. हल्ला झालेल्या भाजप कार्यकर्त्याने त्यांना कळवलेली माहितीही त्यांनी पोस्ट केली आहे: “किरीटजी, मी शिरीष वल्लभ कटेकर पंढरपूर. काल दिनांक सहा रोजी संध्याकाळ वेळ ६.वाजता, माझ्यावर शिवसेना शहर प्रमुख रवि मुळे व सत्तर ते ऐंशी शिवसैनिकानी लोकांनी येवून माझ्यावर काळे आॅईल द्रव पदार्थ ७/८ बाटल्या ओतल्या, मारहाण केली, काही जण कुकरीने मारुन ह्याला खलास करू म्हणत होते.”

 

At last Police agreed to register FIR against Shivsena’s Gundas who assaulted/beaten BJP Pandharpur Leader Shirish Katekar. We want all 9 of them be arrested immediately. It’s shocking CMO, Maharashtra Hone Minister Anil Deshmukh silent on this Gundaism @BJP4Maharashtra pic.twitter.com/apTeVRgIHB

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 7, 2021

 

याआधीही बदलापुरात ढोका दापिवली ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपाच्या विजेत्या सदस्यांवर हल्ला झाला. ते हल्लेखोरही शिवसेनेचे होते असा सोमैयांचा आरोप आहे. त्या कार्यकर्त्यांसह त्यांनी राज्यपाल कोश्यारींची भेटही घेतली.

 

या प्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनीही सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसमोर कायदा हातात घेऊन नंगानाच? राज्यात सत्ता आहे याचा इतका दुरुपयोग. सैनिकाच्या घरात घुसून त्याला मारण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर खुद्द पोलिसांसमोर कायदा हातात घेण्यापर्यंत शिवसेना कार्यकर्त्यांची मजल जाते’, अशा शब्दांत राम कदम यांनी संताप व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडी सरकारने या हल्लेखोरांवर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरून, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

#पंढरपूर मध्ये #शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पोलिसांच्या समोर कायदा हातात घेऊन नंगानाच ? राज्यात सत्ता आहे याचा इतका दुरुपयोग . सैनिकाच्या घरात घुसून त्याला मारण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर खुद्द #पोलिसांसमोर कायदा हातात घेण्यापर्यंत #शिवसेना कार्यकर्त्यांची मजल जाते pic.twitter.com/j8KIKetAZF

— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) February 7, 2021


Tags: BJPBJP Ram kadamCM Udhav thackerayCMO MaharashtraKirit Somaiyashiv senaनेते किरीट सोमैयापंढरपूरभाजप आमदार राम कदममुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये पदवीधर/टेक्निशिअन अप्रेंटिसशिपसाठी भरती

Next Post

१५ फेब्रुवारीपासून टोलसाठी फास्टॅग बंधनकारक, ते मिळवायचे तरी कसे?

Next Post
fastag

१५ फेब्रुवारीपासून टोलसाठी फास्टॅग बंधनकारक, ते मिळवायचे तरी कसे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!