Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

१५ फेब्रुवारीपासून टोलसाठी फास्टॅग बंधनकारक, ते मिळवायचे तरी कसे?

September 6, 2026
in उपयोगी बातम्या
0
fastag

मुक्तपीठ टीम

भारतात आता प्रवास करताना टोलसाठी फास्टॅग पाहिजेच पाहिजे. लोकांना दिलासा देण्यासाठी फास्टॅगच्या अंमलबजावणीची तारीख अनेक वेळा वाढविण्यात आली होती. मात्र आता तारीख आणखी पुढे वाढवणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर असणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच फास्टॅग नेमके काय आहे, ते समजवतानाच ते कसे मिळवावे याची माहिती देण्याचा मुक्तपीठचा प्रयत्न:

 

या वर्षाच्या सुरूवातीलाच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एनएचआयने जाहीर केले की टोल नाक्यावर १ जानेवारी २०२१ पासून रोख रकमेद्वारे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे टोल स्वीकारण्यात येणार नाही. तथापि, ही अंतिम मुदत नंतर १५ फेब्रुवारी करण्यात आली. एनएचएआयने दिलेल्या माहितीनुसार, टोल देयकामध्ये फास्टॅगचा सध्या जवळपास ७५ ते ८० % भाग आहे. याचा अर्थ असा आहे की, प्रत्येक १०० वाहनांपैकी सुमारे ८० वाहने फास्टॅग वापरुन टोल भरतात.

 

एनएचएआय १५ फेब्रुवारीपासून टोलनाक्यावर १००% कॅशलेस टोलवसुलीचा प्रयत्न करीत आहे. या दिशेने पाऊल उचलण्यात वारंवार विलंब झाला आहे. परंतु आता तसे होणार नाही. त्यामुळेच फास्टॅग व्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे:

 

काय आहे फास्टॅग?

  • फास्टॅग हे स्टीकर आहे. त्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी चिप असते.
  • टोल रस्त्यांवरील प्रत्येक मार्गिकेत टोल नाक्याजवळ एक स्कॅनर कॅमेरा लावलेला असतो. तो फास्टॅग स्टिकर स्कॅन करतो. त्यातून वाहनधारकाचे खाते आणि टोल कंपनी यांच्यात व्यवहार होतो.
  • चिपला एक प्रीपेड खाते जोडलेले असते.
  • त्या खात्यातून आपोआप टोलचे पैसे वळते होतात.
  • त्यामुळे टोलची रक्कम अदा करण्यासाठी थांबण्याची गरज राहत नाही.

 

कसे मिळवायचे फास्टॅग

  • आपल्या ओळखपत्रासह वाहन नोंदणीची कागदपत्रे घेऊन भारतात काही टोल नाक्यावर फास्टॅग खरेदी करता येते.
  • फास्टॅग ऑनलाइनही मिळवता येते. ते तुम्ही www.amazon.in वर खरेदी करू शकता.
  • फास्टॅग काही बँकांमधूनही उपलब्ध आहे.
  • सध्या फास्टॅग उपलब्ध करून देणाऱ्या बँकांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक बँक, अ‍ॅक्सिस बँक तसेच पेटीएम पेमेंट्स बँक यांचा समावेश आहे.
  • काही बँकांचे कर्मचारी फिरती वाहने घेऊनही टोल नाक्यांजवळ उभी असतात, त्यांच्याकडूनही खरेदी करता येते.

Tags: fastagNHAINitin Gadkariएनएचएआयनितीन गडकरीफास्टॅगफास्टॅग कॅशबॅकभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
Previous Post

बदलापूर ते पंढरपूर…शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष पेटला!

Next Post

#मुक्तपीठ सोमवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ सोमवारचे 'टॉप-१० व्हायरल बुलेटिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!