मुक्तपीठ टीम
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी जवळपास १०० दिवसानंतर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. २ लाखाच्या जातमुचलत्यावर जामीन मंडूर झाला आहे. संजय राऊत यांना ३१ जुलै २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह त्यांचे सहकारी प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ईडी उच्च न्यायालयात धाव घेतली असता राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे राऊत यांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संजय राऊतांना जामीन मंजूर!!
- कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती.
- संजय राऊतांना अटक केल्यानंतर आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
- या प्रकरणी पीएमएलए न्यायालयासमोर सुनावणी सुरू होती.
- सातत्याने संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते.
- संजय राऊतांची दसरा-दिवाळीही तुरुंगातच गेली.
- शिवसेना नेते संजय राऊत यांना आज पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
- यावेळी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
- त्यामुळे राऊत यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- संजय राऊत यांना जामीन मिळावा म्हणून अनिल देशमुख प्रकरणाचा दाखला देण्यात आला.
- देशमुख यांना ज्या पद्धतीने जामीन देण्यात आला. त्याच धर्तीवर राऊतांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली.
- न्यायालयाने ही मागणी मंजूर करत त्यांना २ लाखाच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले.
संजय राऊतांवर कोणते आरोप करण्यात आले होते?
- संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ३१ जुलै रोजी ईडीने अटक केली होती.
- त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला आहे.
- संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते.
- त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले होते.
- त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.
- याच पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती.
- राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे.
- या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
- तसेच, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं केला आहे.