Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवी मुंबईत नवं घडतंय…शिवसेना-राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग! मोफत कोरोना लसीचे आश्वासन!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ashish shelar

मुक्तपीठ टीम 

नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करायचे आहे, असे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले तर नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस मिळायला हवी, अशी भूमिका भाजपा नेते आमदार गणेश नाईक यांनी जाहीर केली.

आपल्या समर्थकांसह शिवसेना उप विभाग प्रमुख मनोज शिंदे, शाखा प्रमुख सागर शिंगाडे, माजी उपविभाग प्रमुख शंकर पाटील, आनंद पवार, उपविभाग संघटक मीनाताई पाटील, अखलाक शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे राहुल कश्यप या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज नवी मुंबई भाजपा निवडणूक प्रभारी आमदार अँड आशिष शेलार आणि गणेशजी नाईक यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
क्रिस्टल हाऊस येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, सागर नाईक, संदीप नाईक यांच्यासह संजय उपाध्याय असे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील जनतेच्या सेवेसाठी आपण काम करीत आहोत. जनतेने आपल्या प्रेम दिले असेही त्यांनी नमूद केले.

कोरोना लस आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकुण आर्थिकदृष्ट्या विचार करुन सामान्य नागरिकांना कशी लस उपलब्ध करून देणार याबाबत निर्णय घेतीलच. पण जर केंद्र सरकारने ही लस सर्वसामान्यांना मोफत उपलब्ध करुन दिली नाही तर नवी मुंबईतील सुमारे १५ लाख नागरिकांना महापालिकेने लस मोफत उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी बजेटमध्ये 150 कोटींची तरतुद करण्यात यावी अशी मागणी आपण नुकतीच पालिका आयुक्तांकडे केली आहे. नवी मुंबईतील नागरिकांना मोफत लस मिळावी हीच आमची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.

तर यावेळी भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या पराभवाची सुरुवात नवी मुंबईतून होईल. आ. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे शहर देशातील एक नंबरचे स्वच्छ शहर झाले. या स्वच्छ शहराला आता भाजपाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करायचे आहे. त्यामुळे नवी मुंबईतील जनता भाजपालाच विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 


Tags: अखलाक शेखआनंद पवारआमदार अँड आशिष शेलारमनोज शिंदेमीनाताई पाटीलरामचंद्र घरतशंकर पाटीलसंदीप नाईकसागर नाईक
Previous Post

रिझर्व्ह बँकेत मॅनेजरसह अन्य पदांसाठी संधी, वेतन ७७ हजारांवर

Next Post

पालघरमध्ये तीन लग्न समारंभांवर का पडली धाड?

Next Post
palghar

पालघरमध्ये तीन लग्न समारंभांवर का पडली धाड?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!