Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बंडखोरांना उत्तर: शिवसैनिक एकनिष्ठता दाखवण्यासाठी सरसावले, प्रतिज्ञापत्र, पेटते दिवे आणि बरंच काही!

July 22, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Shiv Sainiks support Uddhav Thackeray (2)

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने पक्षावर मोठे संकट आले आहे. सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असे दोन गट पडले आहे. दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. बंडखोऱ्यांना उत्तर देण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा दर्शवण्यासाठी शिवसैनिक सरसावले आहेत. शिवसैनिक हातात पेटते दिवे घेऊन तर कधी बंडखोरांना आव्हान तर कधी पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र व ऑनलाईन सदस्य नोंदणी करून घेतली जात आहे.

हातात पेटते दिवे घेऊन शिवसैनिकांनी घेतली एकनिष्ठतेची शपथ!!

  • उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा दर्शवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जळगावात हातात पेटते दिवे घेऊन एकनिष्ठतेची शपथ घेतली.
  • जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे गुरुवारी संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला.
  • या मेळाव्यात संजय सावंत यांनी उपस्थित सर्व शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची एकनिष्ठेची शपथ देण्यात आली.
  • प्रत्येक शिवसैनिकाने हातात दिवे घेऊन आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची शपथ यावेळी घेतली.
  • यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

संजय सावंतांचा बंडखोरांना इशारा!!

  • जळगाव जिल्हृयात सर्व लोकसभा मतदारसंघांनिहाय‍ शिवसेना पक्ष बळकटीकरण तसेच संघटीत करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.
  • त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी जळगाव शहरातील केमिस्ट भवन येथे शिवसेना जळगाव लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला.
  • यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत हे आक्रमक दिसले.
  • आज उध्दव ठाकरे यांना ज्यांची गरज होती, त्यावेळी यांनी बंड पुकारले.
  • जर तुमच्याच जिद्द असेल, मर्दपणा असेल असे तर महाराष्ट्रात आमदारकीचा राजीनामा द्या, अन् निवडून येतांना सांगा की निवडून आलो.
  • नाही तर तर हा शिवसैनिक तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय सावंत यांनी बंडखोरांना दिले आहे.

धुळ्यात निष्ठा व्यक्त करणारी प्रतिज्ञा!!

  • धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
  • शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पक्षप्रमुखांविषयी व मूळ शिवसेनेविषयी निष्ठा व्यक्त करणारी प्रतिज्ञा लिहून घेतली जात आहे.
  • आमदारांच्या बंडखोरीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिवसैनिकांकडून आपण उद्धव ठाकरे गटातील मूळ शिवसैनिक असल्याबाबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी करून घेण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते.
  • त्यानुसार धुळे शहरातील शिवसेनेच्या मुख्य कार्यालयात पदाधिकारी व शिवसैनिकांकडून ही स्टॅम्प भरून घेतले जात आहे.
  • जवळपास पाच हजार स्टॅम्प पेपर्स धुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांतर्फे भरून घेण्यात आले आहेत.

असे आहे शपथपत्र

नाव, वय, पत्ता, शिवसेनेतील पदाच्या उल्लेखासह मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञापत्र घोषित करीत आहे की, माझी शिवसेनेच्या घटनेवर पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श-तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. माझा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. शिवसेनेच्या घटनेतील उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी मी कार्यरत राहील, असे मी प्रतिज्ञापत्र बाँडद्वारे लिहून देत आहे.


Tags: Eknath Shinde GroupjalgaonSanjay SawantShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे गटजळगावशिवसेनाशिवसैनिकसंजय सावंत
Previous Post

CBSE बारावीचा निकाल जाहीर, ९२.७१ टक्के उत्तीर्ण! लिंक क्लिक करा आणि झटपट निकाल जाणून घ्या…

Next Post

स्वयंशिस्त आणि रोखठोकशैलीचे गतिमान नेते अजितदादा पवार!

Next Post
Ajit pawar

स्वयंशिस्त आणि रोखठोकशैलीचे गतिमान नेते अजितदादा पवार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!