मुक्तपीठ टीम
कोरोना संकटात इतर धार्मिक स्थळांप्रमाणेच आपल्य शिर्डीच्या साईबाबांचे मंदिरही निर्बंधामुळे बंद ठेवण्यात आले आहे. साईंच्या संदेशाप्रमाणे सबुरीनं सारं बंद असलं तरी सेवकार्यावरील श्रद्धा मात्र कमी झालेली नाही.
गेल्या वर्षीच्या तुलनेत शिर्डी ट्रस्टला यंदा ८३ टक्के कमी देणगी मिळाली असली तरी, येथे सेवाकार्य मात्र अधिक जोमानं सुरु आहे.
साई ट्रस्ट संचलित कोरोना रूग्णालयामधून आतापर्यंत ७ हजाराहून अधिक कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. येथे रूग्णांसह, त्यांच्या कुटूंबांसाठी राहण्याची सोय, खाणेपिणे व इतर गोष्टीसुद्धा मोफत आहेत. शिर्डी साई धाममध्ये २०१८ मध्ये १ कोटी ६५ लाख भाविक, २०१९ मध्ये १ कोटी ५७ लाख भाविकांनी भेट दिली, परंतु २०२० मध्ये कोरोना निर्बंधांमुळे मंदिर बंद ठेवावे लागले. पहिल्या लाटेनंतर मंदिर उघडले तेव्हा १६ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान ५ कोटी ७४ लाख भाविकांनी दर्शन घेतले. २०२१ मध्ये १ जानेवारी ते ५ एप्रिल दरम्यान भाविकांची संख्या सुमारे ६२ हजार राहिली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, ट्रस्टने एप्रिल २०२० मध्ये कोरोना रूग्णालय तयार केले आणि रुग्णांचे उपचार येथे विनामूल्य सुरू केले.
एप्रिल २०२० पासून आतापर्यंत येथे ७ हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. ट्रस्टची टीम जी यापूर्वी भाविकांच्या सेवेत तैनात होती, ती आता रुग्णांच्या सेवेत गुंतलेली आहे. सुमारे तीन हजार कर्मचारी रुग्णालयातच सेवा देत आहेत. सुपर मल्टी स्पेशालिटी रूग्णालयाशिवाय जनरल रूग्णालयामधील कोरोना रूग्णांच्या उपचाराचीही व्यवस्था केली आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज हरिश्चंद्र बागाते म्हणाले की, “आम्ही कोरोना रुग्णांवर विनामूल्य उपचार करीत आहोत. मल्टी स्पेशालिटी रूग्णालयांमध्ये कोणत्याही सुविधेत थोडीशी फी आकारली गेली तरी राज्य किंवा केंद्र सरकारच्या योजनांद्वारे त्याची भरपाई केली जाते. यामुळे रुग्णावर कोणताही ओझे लादले जाणार नाही.”
शिर्डी ट्रस्टने दिलेल्या सुविधा
- शिर्डी ट्रस्टने ६४० खाटांचे कोरोना रुग्णालय तयार केले आहे.
- १४० ऑक्सिजन बेड आणि २० व्हेंटिलेटर बेड आहेत.
- कोरोनामुळे तीन ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- तिन्ही ठिकाणे एकत्र केले तर जवळपास दीड हजार खाटांची सोय आहे.
- नीता अंबानी आणि चेन्नईच्या केव्ही रमाणी यांनी ट्रस्टला ३ कोटी रुपयांची देणगी दिली.
- येथे ऑक्सिजन प्लांट तसेच आधुनिक आरटीपीसीआर लॅब तयार केली गेली आहे.
साई बाबा ट्रस्टला मिळालेली देणगी
- कोरोना कालावधीत साई बाबा ट्रस्टला २९५ कोटींपेक्षा कमी रुपये मिळाले.
- ट्रस्टला सन २०१९-१९ मध्ये ४२८ कोटी रुपयांची देणगी मिळाली.
- तसेच २४.७९५ किलो सोने, ४२८.५५५ किलो चांदी मिळाली होती.
- सन २०१९-२० मध्ये ३५७ कोटी रुपयांची देणगी मिळाली.
- १७.९० किलो सोने आणि ३५७.४९२ किलो चांदी मिळाली होती.
- कोरोना कालावधीत म्हणजेच १ एप्रिल २०२० ते २५ मे २०२१ पर्यंत ट्रस्टला ऑनलाइन ६२ कोटी दान मिळाले.
पाहा व्हिडीओ: