Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

५० खोके वाद: सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांवर २ हजार ५०० कोटींचं संकट!

November 9, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Defamation Case

मुक्तपीठ टीम

शिवसेनेतील बंडानंतर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत शिंदे गटाच्या आमदारांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. ५० खोक्यांवरून सुरु झालेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात यावरुनच वाद निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांविरोधात २ हजार ५०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनाही इशारा दिला.

५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा ठोकणार…

  • खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटानं दिला आहे.
  • विरोधकांच्या आरोपांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचे नवे प्रवक्ते म्हणून विजय शिवतारे यांची नियुक्ती केली आहे.
  • विजय शिवतारे यांनीही जबाबदारी मिळताच कामाला सुरुवात केली आहे.
  • यासोबतच आरोप करणाऱ्या नेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही त्यांनी ठरवले आहे.
  • एकनाथ शिंदे गट आघाडीच्या नेत्यांना २ हजार ५०० कोटींच्या मानहानीच्या नोटिसा पाठवणार आहे.

काय म्हणाले विजय शिवतारे?

  • पत्रकार परिषदेला संबोधित करताना विजय शिवतारे यांनी यासंबंधित माहिती दिली.
  • राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर ५० कोटी घेऊन भाजपाला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.
  • त्यांना मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. विजय शिवतारे म्हणाले की, एकतर त्यांनी न्यायालयात आरोप सिद्ध करावे किंवा त्यांनी माफी मागावी, माफी मागितली नाही, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अडीच हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला जाईल.

२ हजार ५०० कोटींचा बदनामीचा फॉर्म्युला काय?

  • महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता.
  • त्यामुळे शिंदे गटाने प्रत्येक आमदाराच्या बदनामीची रक्कम ५० कोटींवर ठेवली आहे.
  • अशा स्थितीत या रकमेची एकूण रक्कम २ हजार ५०० कोटी आहे.
  • यासंदर्भात आरोप करणाऱ्या नेत्यांना शिंदे गट बुधवारी नोटीस पाठवणार आहे.

Tags: aditya thackerayDefamation CaseMaharashtraMVAShinde CampSupriyaSuleVijay Shivtareआदित्य ठाकरेमहाराष्ट्रमहाविकास आघाडीमानहानीचा खटलाविजय शिवतारेशिंदे गटसुप्रिया सुळे
Previous Post

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुडांनी बजावली ‘या’ महत्वाच्या खटल्यांमध्ये भूमिका…

Next Post

अखेर १०० दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर!

Next Post
Shiv Sena leader Sanjay Raut gets bail in Patra Chawl land scam

अखेर १०० दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!