Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेची नावं आणि चिन्हं! जे ठाकरेंनी मागितले तेच शिंदेंनाही पाहिजे! आता आयोग काय करणार?

October 10, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
shivsena vs eknath shinde

मुक्तपीठ टीम

निवडणुक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटानं तीन चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यातील दोन चिन्हांवर आता शिंदे गटानंही दावा केल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाच्या यादीतील तीन पर्यायांमध्ये त्रिशुळ आणि उगवता सूर्य आणि मशालचा सामेवश आहे. शिंदे गटानं ठाकरे गटाच्या यादीतील त्रिशुळ आणि उगवता सूर्य ही दोन चिन्हं आपल्याही यादीत ठेवली आहेत. तिसरा पर्याय त्यांनी गदा हा दिला आहे. निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत. आता दोन्ही गटांकडून दोन सारख्याच चिन्हांची मागणी करतानाच नावांमध्येही बाळासाहेबांचा उल्लेख असणारी सहापैकी पाच नावे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता आयोग नेमकं काय करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे गटाची ठाकरे उल्लेख असलेली ३ नावे, ३ चिन्हे सादर!

  • ठाकरे गटाकडून चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय ठेवले आहेत.
  • त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय असून उद्धव ठाकरेंकडून रविवारी महाराष्ट्राला संबोधीत करताना ही चिन्हे जाहीररीत्या दाखवली.
  • शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पर्याय नावांसाठी शिवसेनेने सादर केले आहेत.

शिंदे गटाने ठाकरे गटाची २ चिन्हे, एक नाव घेतले!

  • आता शिंदे गटानंही ठाकरे गटाने सादर केलेल्या चिन्हांपैकी दोन चिन्हे मागितली आहेत.
  • त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही चिन्हं सारखी आहेत तर तिसरे गदा हे वेगळे आहे.
  • तसेच त्यांच्या नावांच्या तीनही पर्यायांमध्ये बाळासाहेबांचा उल्लेख आहे.
  • नावासाठीचा पहिला पर्याय तर ठाकरे गटासारखाच शिवसेना बाळासाहेब ठाकरे असा आहे.
  • इतर दोन नावं, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची ही आहेत.

आता निवडणूक आयोग काय करणार?

  • खरंतर एका गटाने सादर केलेली चिन्हं आणि नावं माहित असतानाही दुसऱ्या गटाने तेच पर्याय म्हणून देणे कितपत योग्य, असा मुद्दा निवडणूक आयोगासमोर ठाकरे गट उपस्थित करण्याची शक्यता आहे.
  • दुसरं असं की ठाकरे अथवा बाळासाहेब ही नावं उद्धव ठाकरेंशी नात्यानं संबंधित आहेत, एकनाथ शिंदेंचं तसं काही नाही.
  • त्यामुळे ते जरी शिवसेनेचे नेते असले तरी ते नाव मागण्याच्या त्यांच्या अधिकारावरही शिवसेना आक्षेप घेण्याची शक्यता आहे.
  • बिहारमधील लोकजनशक्ती पार्टी या पक्षाचे उदाहरण बोलके आहे. तेथे राम विलास पासवानांच्या मुलाला लोक जनशक्ति पार्टी रामविलास पासवान तर त्यांचे काका पारसानाथांना राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी असे नाव मिळाले.
  • मात्र, जाणकारांच्या मते, आतापर्यंतचा या प्रकरणातील अनुभव पाहता,दोन्ही गटांनी सारख्याच चिन्हांचा दावा केल्यामुळं आता निवडणूक आयोग ही दोन्ही चिन्हं बाद करण्याची शक्यता आहे.
  • तसेच शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाच्या दोन्ही गटांच्या पहिल्या पर्यायाबद्दलही होऊ शकेल.
  • मात्र, इतरही चार पर्यायांमध्ये बऱ्यापैकी साधर्म्य आहे.
  • त्यामुळे आता निवडणूक आयोग यासंदर्भात काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags: election commissionShinde CampShivsenaनिवडणूक आयोगशिंदे गटशिवसेना
Previous Post

मुंबईत DRIने विमानतळावर जप्त केले विदेशी प्रजातीचे ६६५ प्राणी

Next Post

मस्क, अदानी यांनी भारतातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त संपत्ती गमावली!

Next Post
Elon Musk And Gautam Adani

मस्क, अदानी यांनी भारतातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त संपत्ती गमावली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!