Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रायगडमधील महाडच्या वाकी बुद्रुकचा देवी सोमजाई देवस्थानाचा शिमगोत्सव वेगळाच!

March 18, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Shimgotsav of Goddess Somjai Devasthan of waki budruk of Raigad

महेश कदम

शिमगा आणि कोकण…शिमगा म्हणजे कोकणाचा उत्साही उल्हास. गणपती सणानंतर कोकणातील चाकरमान्यांना वेध लागतो ते शिमग्याचे. मग त्यासाठी दोन दिवस का होईना कोकणी माणूस गावाला जाणारच. कोकणात शिमगा साजरा करण्याच्या प्रथा प्रत्येक जिल्हय़ात थोड्या वेगळ्याच अनुभवता येतात.

Somjai Devi raigad

कोकणात शिमगा सणाला अधिक महत्त्व आहे. कोकण हे नैसर्गिक सौंदर्य ने नटलेला आहे. शिमगा खेळताना सारे समान असतात. त्यातून माती व नाती टिकून राहतात. मुंबईतील व अनेक ठिकाणी रहिवासी असलेले चाकरमणी होळी सणासाठी कोकणात धावून येतात.

Somjai Devi Raigad

कोकणातील रायगडच्या महाड तालुक्यातील वाकी गावात ग्रामदैवत आई सोमजाई देवस्थान मंदिर आहे. आई सोमजाई देवीची पाषाण मूर्ती ही पुरातन आहे. जुनी परंपरा राखत पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा केली जाते. आई सोमजाई देवी हे जागरूक देवस्थान आहे. अनेक पिढ्यांपासून लोकं भक्तिभावाने आईची पूजा अर्चना करतात, होळी ह्या सणात आई सोमजाई ची पालखी प्रतेक गावात घरोघरी फिरते, पालखी सजवली जाते, आईची खणा-नारळाने ओटी भरली जाते. तिची वाजत गाजत स्वागत केली जाते. गुलाल उधळत फटाके वाजवत एकच जल्लोष केला जातो.

Somjai Devi Raigad

रस्त्याने पालखी जाताना भाविक दर्शन घेत राहतात. घरांच्या अंगणात रांगोळी व सजावट केली जाते. ती वस्तीला असते. आरती, कीर्तन, भजन, पुजा, महाप्रसाद केला जातो. मान सन्मानाने तिची भक्ती व जयघोष केला जातो, आपल्या मनातील जी इच्छा असेल ते नवस केला जातो. नवस पूर्ण झाल्यावर तिची ओटी भरली जाते. अनेक जण तिच्या दर्शनाला आतुरतेने येतात मग तो मंत्री असो की सामान्य माणूस. उच्च व गरीब असो. जाती भेद व अहंकार वगळता एक समान होतात व आईच्या चरणी नतमस्तक होतात.

 

आई श्री सोमजाई देवस्थानच्या वतीने वर्षानुवर्ष आईचा सोहळा साजरा केला जातो. आई श्री देवी सोमजाई हे स्वयंभू पुरातन जागृत देवस्थान मानलं जातं.

Somjai Devi Raigad

शिमगोत्सवात आईच्या उत्सवासाठी कार्यक्रमांची रेलचेल

  • देवीचा पालखी उत्सव हे शुक्रवार दिनांक: १८|३|२२ ते शनिवार दि: २६|३|२२ पर्यंत संपन्न होणार आहे.
  • शुक्रवार दि: १८|३|२२, सकाळी १० ते ११वा.
  • पालखी सजावट (गादीवर) नंतर पालखी सोमजाई मंदिराला भेट व प्रदक्षिणा होऊन शेवते गावाकडे प्रस्थान, रात्री गावठाण येथे वस्ती.
  • शनिवार: १९ ता. सकाळी पालखी मिरवणूक गावठण व रात्री नानेमाची येथे वस्ती.
  • रविवार: २०ता. सकाळी, ७ ते ५वा. पालखी मिरवणूक नानेमाची व नानेमाची आवाड, रात्री शेवते येथे वस्ती,
  • सोमवार: दि. २१ता. शेवते येथे पालखी मिरवणूक, रात्री आंब्याचा माळ येथे वस्ती,
  • मंगळवार दि: २२ता. आंब्याचा माळ येथे मिरवणूक व रात्री खरकवाडी येथे वस्ती,
  • बुधवार: २३ता. खरकवाडी येथे पालखी मिरवणूक, त्यानंतर रोहिदासवाडी येथे पालखी मिरवणूक व शेदुरमळई रेथे वस्ती. गुरुवार २४ ता. शेदुरमळई येथे पालखी मिरवणूक, नंतर नारायण वाडी येथुन प्रस्थान व नांद्रुकवाडी येथे वस्ती.
  • शुक्रवार: २५ ता. नांद्रुकवाडी येथे पालखी मिरवणूक, पेडामकरवाडी पालखी मिरवणूक नंतर शिवाजी नगर येथे पालखी मिरवणूक व वस्ती.
  • शनिवार: २६ ता. रोजी सकाळी देवी गादीवर पालखी विसर्जन होणार आहे.

 

या सोहळ्यासाठी श्री सोमजाई देवस्थानचे कार्यकारणी सदस्य संजय गंगाराम कदम (अध्यक्ष) प्रकाश चंद्रु दरेकर (उपाध्यक्ष), श्रीरंग भागोजी भोसले (सचिव) अमोल भाऊ जाधव (खजिनदार) तसेच विश्वस्त मोहन रामचंद्र म्हामुणकर, प्रदीप रघुनाथ म्हामुणकर, प्रभाकर दिनकर कदम, दिपक यशवंत कदम, गणपत विठोबा सालेकर, सदाशिव दगडु मोरे, रोहिदास रामा जाधव, बबन शिवराम मोरे, सुरेश मोतीराम म्हामुणकर, द्वारकानाथ जाधव सर (सरपंच) यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: MahadraigadShimgotsavSomjai Deviदेवी सोमजाईमहाडरायगडवाकी बुद्रुकशिमगोत्सव
Previous Post

संयमानं थांबले दोन वर्ष, आता भरून निघतेय कसर! गावाच्या मातीत, वाढतेय शिमग्याची आणखीच रंगत!!

Next Post

मुंबई पोलिसांवरही ‘श्रीवल्ली’ची जादू, परफॉर्मन्स पाहाल तर नक्कीच आवडेल

Next Post
Mumbai Police band performance on srivalli song

मुंबई पोलिसांवरही 'श्रीवल्ली'ची जादू, परफॉर्मन्स पाहाल तर नक्कीच आवडेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!