देशात कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. भारताला वर्षाच्या सुरुवातीलाच दोन लसींच्या आपत्कालीन वापारास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच देशात प्रत्यक्ष लसीकरणास देखील सुरुवात होणार आहे. अशातच ‘हम’, ‘गोपी किशन’, ‘आंखे’, ‘बेवफा सनम’, ‘खुदा गवाह’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोरोनावरील लस घेणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. मात्र, तिने दुबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने करोना लस घेतानाचा अनुभव सांगितला आहे. शिल्पाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने “मी लस घेतली आहे आणि सुरक्षित… न्यू नॉर्मल… २०२१मध्ये आले”, असे तिने फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री शिल्पा विवाहा बंधनात अडकल्यानंतर थोडे दिवस भारतात राहिली. त्यानंतर दुबईला शिफ्ट झाली. एका मुलाखतीत तिने आपले लग्न २००० साली झाल्याचे सांगितले होते. सध्या शिल्पा दुबईमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत आहे.