Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोबाईल चोरीच्या संशयावरुन तरुणांना बेदम मारहाण करून व्हिडीओ व्हायरल

कांदिवलीतील धक्कादायक घटना; पाच आरोपींना अटक व कोठडी

January 8, 2021
in कायदा-पोलीस
0
mobile theft video viral

मोबाईल चोरी केल्याच्या संशयावरुन एका तरुणासह त्याच्या मित्राला घरातून बाहेर काढून बेदम मारहाण करुन आणि मारहाणीचे मोबाईलवरुन व्हिडीओ काढून ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी नऊ आरोपीविरुद्ध भादवी आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे, याच गुन्ह्यांत गुरुवारी पाच आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना बोरिवलीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपींमध्ये रविंद्र दुलगंज, राहुल बिदलांग हौरजे, रोहित कांगडा, योगेश टाक आणि विजय दुधकांच यांचा समावेश आहे. या वृत्ताला पोलीस निरीक्षक रवी आडाणे यांनी दुजोरा दिला आहे.

 

कांदिवली परिसरात २१ वर्षांचा तक्रारदार तरुण राहतो, तो मूळचा हरियाणाचा रहिवाशी आहे. बुधवारी ६ जानेवारीला तो त्याच्या मित्रासोबत त्याच्या घरी होता, यावेळी त्याच्या घरी आठ ते नऊजणांच्या एका टोळीने प्रवेश केला, या सर्वांनी संगनमत करुन या तरुणासह त्याच्या मित्राला त्याच्या कांदिवलीतील जनता कॉलनीतील राहत्या घरातून मालाड येथील काचपाडा परिसरात ऍक्टिव्हा बाईकवरुन आणले, तोपर्यंत ते सर्वजण त्यांना मारहाण करीत होते. काचपाडा येथे आणल्यांनतर त्यांनी त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्याचे केस आणि मिशा काढून अर्धनग्न केले. तसेच या संपूर्ण घटनेचे मोबाईलवरुन चित्रीकरण केले, ते व्हिडीओ नंतर त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्यांची बदनामी केली होती. या प्रकारानंतर या दोघांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी या तरुणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आठ ते नऊ तरुणांविरुद्ध ३६५, ३०७, ३२४, ५०६ (२), १४३, १४५, १४७, १४८, भादवी सहकलम ६७ आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

 

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक रवी आडाणे यांच्या पथकाने या आरोपींचा शोध सुरु केला होता, ही शोधमोहीम सुरु असतानाच पाचही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना दुपारी बोरिवलीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने या सर्वांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्वांची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांच्या चौकशीत त्यांच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली आहे, त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. दरम्यान बुधवारी घडलेल्या या घटनेने कांदिवली परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.


Tags: mobile theftvideo viral
Previous Post

पासिंग द पार्सल- पत्राचाळीचा डर्टी गेम

Next Post

‘ही’अभिनेत्री ठरली लस घेणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी

Next Post
Shilpa shirodkar

‘ही’अभिनेत्री ठरली लस घेणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!