मुक्तपीठ टीम
सातत्यानं होत असलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ राजकारणाला तापवत आहे. यूपीए सत्ताकाळात महागाई-भ्रष्टाचारावरून आक्रमक असणारे बाबा रामदेव यांनी जनतेलाचा जास्त परिश्रमाचा सल्ला दिला. तर राहुल गांधींनी मोदींवर ट्विटरास्त्र सोडत शेजारच्या देशांमधील इंधनाचे दर सांगितले. तसेच “प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान । जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥” असा टोलाही मारला. त्याला भाजपा नेत्यांनीही कडक उत्तर दिलं आहे. शहजाद पूनावाला यांनी अफगाणिस्तान आणि इतर देशांमधील पेट्रोल-डिझेल दरांऐवजी राहुल गांधींनी काँग्रेस सत्तेत असलेल्या महाराष्ट्र आणि राजस्थानातील जास्त करामुळे असलेले इंधन दर पाहावेत, असा टोला लगावला आहे.
Some facts on inflation & price rise that Congress & @RahulGandhi
won’t tell you about1 litre petrol in Mumbai- Rs 116.72 because Maharashtra chose not to cut VAT… 1 litre in Rajasthan Rs 112.80 as VAT rate is 31.1%! Compare this with rate in UP which is less than Rs 100
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) March 31, 2022
राहुल गांधी यांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, भुतान, नेपाळ आणि भारतातील पेट्रोलच्या दरातील फरक ट्विटरवर मांडला आहे. त्यांच्या ट्वीटला भाजपा नेते शहजाद पुनावाला यांनी कडक प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस सहभागी असलेल्या आघाडी सरकारने महाराष्ट्रात व्हॅट कमी केला नसल्याचे मांडत राजस्थानमध्येही विक्रीकर जास्त असल्याचे ते म्हणालेत.
पूनावालांनी दिलेलं उत्तर…अफगाणिस्तान नको महाराष्ट्र पाहा!
- महागाई आणि महागाई बाबत काही तथ्ये काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी मांडत आहे.
- मुंबईत १ लिटर पेट्रोल- ११६.७२ रु. याची तुलना यूपीमधील १०० रुपयांपेक्षा कमी दराशी करा
- UPA सत्तेत १ जानेवारी २०१४ रोजी १४.२ किलो विनाअनुदानित LPG सिलेंडर (इंडेन गॅस) ची किंमत १२४१ रुपये होती…. २६ मार्च २०२२- रु. ९४९.५
- NDA अंतर्गत किरकोळ महागाई ५.५-६.५% च्या श्रेणीत आणि कोविड महामारीमुळे काही वेळा ६% च्या वर गेली.
राहुल गांधी यांनी मोदींना काय सांगितलं होतं?
- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वाढत्या इंधन महागाईबद्दल ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला केला.
- अफगाणिस्तानात पेट्रोल ६६.९९, पाकिस्तानात ६२.३८, श्रीलंका ७२.९६, बांग्लादेश ७८.५३, भुतान ८६.२८, नेपाळ ९७.०५ आणि भारतात पेट्रोल १०१.८१ रुपये लीटरनं विकलं जात आहे.
- हे दाखवताना भारतापेक्षा शेजारी देशांमध्ये स्वस्ताई असल्याचे सांगण्याचा त्यांचा हेतू होता.
- पुढे त्यांनी टोलाही मारला, “प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान । जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥”
वाचा:
राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर ट्वीटरास्त्र: “‘प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान। जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥”