Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पवारांचा पॉवर प्लॅन…यूपी-गोवा-मणिपूर राज्यांमध्ये राष्ट्रवादी लढणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sharad pawar said ncp will contest elections in 3 states

मुक्तपीठ टीम

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले असून या पाच राज्यांपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणूक लढणार आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्वत: माहिती दिली आहे. त्यात उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस आगामी ५ पैकी ३ राज्यांच्या निवडणुकीत सहभागी होईल. महत्वाची बाब म्हणजे यावेळी पवारांनी आपण स्वत: उत्तर प्रदेशचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते.

 

गोव्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु

  • पाच राज्यात निवडणुका होत आहेत.
  • या निवडणुकीत राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार आहे.
  • मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार होते.
  • तिथे काँग्रेससोबत पाच जागांवर निवडणूक लढवणार आहोत.
  • तसंच गोव्यात काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहेत.
  • काही ठिकाणी आम्ही जागा लढवू इच्छित आहोत.
  • त्याची माहिती दोन्ही पक्षाला दिली आहे.
  • येत्या दोन दिवसात निर्णय होईल, असं पवार यांनी सांगितलं.

 

उत्तर प्रदेशात परिस्थितीत मोठा बदल

  • शरद पवार स्वत: उत्तर प्रदेशचा दौरा करणार
  • त्याचबरोबर ‘उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसोबत राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे.
  • उद्या एक मोठी बैठक होत आहे.
  • तिथे आमचे प्रदेशाध्यक्ष के.के शर्मा सहभागी होतील.
  • उद्या लखनऊमध्ये जागावाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
  • पुढील आठवड्यात आम्ही तिथे जाणार आहोत.
  • उत्तर प्रदेशात परिस्थितीत मोठा बदल होत आहे.
  • मला आनंद आहे की मेहंदी साहेब जे उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत.
  • त्यांनी गांधी, नेहरूंच्या विचाराने राजकारण केलं.
  • ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत.
  • त्यांच्यासोबत त्यांचे अनेक साथीदार पक्षात येत आहेत.

पवारांकडून योगींचा समाचार

  • उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार आहे.
  • उत्तर प्रगदेशात लोकांना बदल अपेक्षित आहे.
  • तिथे जो एक सांप्रदायिक विचार मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
  • तिथल्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं की ८० टक्के लोक आमच्यासोबत आहेत.
  • २० टक्के फक्त आमच्यासोबत आहेत.
  • अशाप्रकारचं वक्तव्य देशाच्या अल्पसंख्याक समुदाला ठेस पोहोचवणारं आहे.
  • हे वक्तव्य एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभा देत नाही.
  • देशात सेक्युलर विचार मजबूत करायचा असेल, एकतेला ताकद द्यायची असेल तर असा विचार, अशी भूमिका समाजहिताची नाही.
  • त्यामुळे मला वाटतं की उत्तर प्रदेशातील जनता त्यांना धडा शिकवेल.

Tags: BJPGoamanipurNCPsharad pawarTMCUPYogi Aditya Nathउत्तरप्रदेशगोवाभाजपामणिपूरराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

गल्ली ते दिल्ली…मराठा – ओबीसी – एससी, सर्वच समाजघटकांमध्ये का नाराजी?

Next Post

राज्यात ३४ हजार ४२४, तर मुंबईत ११ हजार ६४७ नवे रुग्ण! पुणे ६ हजार १६१!

Next Post
maharashtra corona report

राज्यात ३४ हजार ४२४, तर मुंबईत ११ हजार ६४७ नवे रुग्ण! पुणे ६ हजार १६१!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!