मुक्तपीठ टीम
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. इकबाल कासकर चौकशीनंतर नवाब मलिकांना समन्स बजावण्यात आला आहे. याप्रकरणी सकाळी सात वाजल्यापासून मलिकांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.कुठलं तरी प्रकरण काढून मलिकांना अडकवलं जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती, की आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होतीत., त्यामुळे याबद्दल अधिक भाष्य करायची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
- सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे.
- जे जाहीरपणाने बोलतात त्यांच्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत आहे.
- नवाब मलिक हे केंद्राच्या विरोधात सप्ष्टपणे भूमिका मांडतात, त्यामुळेचं अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करुन कारवाई होत असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
- सद्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो त्याचं हे उदाहरण आहे.
- नवाब मलिक जाहीरपणे बोलातात त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती.
- त्यामुळे अधिक भाष्य करायची गरज नसल्याचे पवार यांनी सांगितले. पुरावे कशाचे? कसली केस काढली त्यांनी? एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषत: मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं.
- कोण काय, कुठं काय माहिती नाही.
- देशात हे सुरु आहे. हे काही नवीन नाही.
- मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी माझ्यावरही असाच आरोप होता.
- त्यावेळीही असं वातावरण तयार केलं होतं.
- २५ वर्ष झाली.
- केंद्र सरकार किंवा एजन्सीबद्दल जे बोलतात त्यांना यंत्रणांचा गैरवापर करुन त्रास दिला जातोय.
मलिकांची चौकशी का?
- पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे पथक सीआयएसएफ जवानांच्या सुरक्षेसह मलिकांच्या घरी पोहचले.
- डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना समन्स बजावण्यात आला आहे.
- मलिक यांना सकाळी ७ वाजल्यापासून मुंबईच्या ईडी कार्यालयात आणले आहे.
- माफिया डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात मलिकांची चौकशी सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे.
- किरीट सोमय्यांनी तसं ट्वीटही केले.
- त्याचबरोबर बॉँबस्फोट प्रकरणातील आरोपीशी केलेल्या मालमत्ता व्यवहार प्रकरणीही नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
- त्यानंतर मलिक कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि इतर नेत्यांशी संपर्क साधला. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी मलिकांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं.
- मलिक कुटुंबिय सध्या कायदेशीर मदतीसाठी अजित पवारांच्या संपर्कात आहेत.
हेही वाचा:
नवाब मलिकांमागे ईडी पिडा: पहाटे साडेचारच्या गुड मॉर्निंगपासून पुढे काय काय घडतंय…
नवाब मलिकांमागे ईडी पिडा: पहाटे साडेचारच्या गुड मॉर्निंगपासून पुढे काय काय घडतंय…